जळगाव जिल्ह्यात 546 भूमिहिनांचे सबलीकरण, 1 हजार 243 एकर जमिनीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:26 PM2017-10-26T12:26:44+5:302017-10-26T12:27:00+5:30
जमीन खरेदीसाठी 16 कोटी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 546 भूमीहिनांना हक्काचे जमीन मालक बनविले आहे. या लाभार्थींना आतापयर्ंत एक हजार 243 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असून 16 कोटी 49 लाख 28 हजार 580 रुपये खर्च करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसुचित जाती आणि नवबौद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना हक्काचे जमिन मालक बनविण्यासोबतच त्यांना जगण्याचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना राबविण्यात येते.
361 एकर जिरायत व 881 एकर बागायती अशी एकूण 1 हजार 243 एकर जमीन जिल्ह्यातील 546 लाभार्थींना वाटप करण्यात आली आहे. 2016-17 मध्ये 1 कोटी 17 लाख 11 हजार रुपए खचरून 39 एकर जमीन खरेदी करण्यात आली. यात 34.46 एकर जिरायती आणि 5 एकर बागायती जमीन असून ही जमीन जिल्ह्यातील 13 लाभार्थींना वाटप करण्यात आली.