पीडिताची साक्ष न घेताही बलात्काराचा प्रयत्न करणा-या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:46 PM2017-11-02T22:46:21+5:302017-11-02T22:49:37+5:30

पीडित महिला एकही दिवस न्यायालयात हजर नसताना तसेच तिची साक्षही झालेली नसताना बलात्काराचा प्रयत्न करणा-या काशिनाथ रुमाल भील (रा.साकरे, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी कलम ३७६ (२) व ५११ खाली सहा वर्ष सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व कलम ४५२ नुसार १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. असा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल असावा. 

Empowerment of the accused who tried to commit rape, without taking testimony of the victim | पीडिताची साक्ष न घेताही बलात्काराचा प्रयत्न करणा-या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

पीडिताची साक्ष न घेताही बलात्काराचा प्रयत्न करणा-या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

Next
ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल  वेडसर महिलेवर झाला होता बलात्काराचा प्रयत्नतीन डॉक्टरांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२ : पीडित महिला एकही दिवस न्यायालयात हजर नसताना तसेच तिची साक्षही झालेली नसताना बलात्काराचा प्रयत्न करणा-या काशिनाथ रुमाल भील (रा.साकरे, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी कलम ३७६ (२) व ५११ खाली सहा वर्ष सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व कलम ४५२ नुसार १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. असा प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल असावा. 
दरम्यान, आरोपीने स्वत:चा बचाव व्हावा यासाठी घटनेच्या आधी आपल्याला मारहाण केली होती, त्यामुळे आपण तेथे नव्हतोच असे सांगून पीडितेच्या नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.
साकरे, ता.धरणगाव येथे २२ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री साडे आठ वाजता ३५ वर्षीय पीडित महिला घरात एकटी असताना काशिनाथ भील हा तिच्या घरात गेला होता. हा प्रकार पाहिल्यानंतर घर मालक कैलास दामू पाटील यांनी तातडीने पीडितेचा भाऊ व आईला बोलावून आणले होते. फटीतून बंद घराचा दरवाजा उघडून त्याला चोप दिला होता. त्यावेळी अर्धनग्न अवस्थेत तो घरातून पळून गेला होता. दुसºया दिवशी धरणगाव पोलीस स्टेशनला काशिनाथ भील याच्याविरुध्द कलम ३७६ (२), ३५४, ३४२,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 
डॉक्टरांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
न्या.के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रत्यक्ष घटना पाहणारे ३, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पुना कंखरे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सचिन अहिरे, डॉ.प्रविण पाटील, पीडित वेडसर असल्याचा अहवाल देणारे डॉ.गिदोडीया (धुळे), तपासाधिकारी टी.एल.साबळे यांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या साक्षी यात महत्वाच्या ठरल्या आहेत. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.सुरेंद्र जी.काबरा यांनी काम पाहिले.
पीडित अखेरपर्यंत न्यायालयात नाही
या खटल्याचे वैशिष्ट असे की, पीडित महिला अखेरपर्यंत न्यायालयात आली नाही. वेडसर असल्याने ती घरातून बेपत्ता झालेली आहे. तसे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वीच बलात्काराच्या प्रकरणात वेडसर, मतीमंद महिला, तरुणी न्यायालयात हजर राहिल्या नाहीत तरी चालेल. ठोस साक्षी व पुराव्याच्या आधारावर गुन्हेगारास शिक्षा देता येईल असे आदेश जारी केले आहेत. सरकारी वकील काबरा यांनी त्याचा संदर्भ न्यायालयात दिला.

Web Title: Empowerment of the accused who tried to commit rape, without taking testimony of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.