रिकाम्या टँकरचे झाकण उडाले; चार जखमी

By admin | Published: May 4, 2017 12:11 AM2017-05-04T00:11:56+5:302017-05-04T00:11:56+5:30

सुदैवाने जीवितहानी टळली : वेल्डिंग सुरू असताना घडली दुर्घटना; मोठा आवाजामुळे फैजपुरात अफवांना ऊत

Empty tanker laps; Four injured | रिकाम्या टँकरचे झाकण उडाले; चार जखमी

रिकाम्या टँकरचे झाकण उडाले; चार जखमी

Next

फैजपूर : शहरातील सावदा रोडवरील मुस्लीम स्मशानभूमीजवळील   बादशाह गॅरेजवर दुरुस्तीसाठी आलेल्या रिकाम्या टँकरला वेल्डिंग करीत असताना व टँकरमध्ये गॅस जमा  झाल्याने टँकरची दोन्ही झाकण उडून जोरदार आवाज झाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र गॅरेजच्या टपावरील पत्रे जोरात उडाली व त्यात बुधवारचा बाजार असल्याने अफवांचासुद्धा बाजार गरम झाला. वेळीच पोलीस व संबंधितांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
बादशाह गॅरेजवर दोन दिवसापासून रिलायन्स लिहिलेले रिकामे टँकर (एमएच १९-झेड ७१९८) हे दुरुस्तीसाठी लावण्यात आलेले होते. बुधवारी या टँकरवरती वेल्डिंगची कामे दोन मजूर करीत होते तर अन्य दोन जण शेजारी बसले होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना  गॅस टँकरमध्ये जमा झाल्याने प्रथम शेवटच्या कप्प्याचे झाकण जोरात उडाले, त्यामुळे धावपळ करत टँकरवरील काम पाहणारे खाली उतरत असताना पुन्हा क्रमांक एकच्या कप्प्याचे झाकण उडाले झाकण उडाले असताना प्रचंड मोठा आवाज झाला.
तर टँकर ज्या गॅरेजच्या पत्री शेडखाली लावले होते. त्यावरील पत्रे अक्षरश: हवेत उडाली. त्यातील काही झाडावर लटकली तर काही शेजारील स्मशानभूमीत जाऊन पडली. त्यात बुधवारचा बाजार असल्याने अफवांना ऊत आला व नागरिक घटनास्थळी धावले. या घटनेत शेजारील शे.इमाम, शाहीद खान (फैजपूर) व टँकरमालक सचिन चौधरी व जगदीश कोळी सांगवी हे चौघे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुठलीच प्राणहाणी झाली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गॅरेजचे मालक सलीम शेख, अख्तर शेख, माजी नगरसेवक  शे.जफर, फौजदार मनोहर मोरे, रामलाल साठे व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 फैजपूर पालिकेच्या अग्निशमन बंबानेसुद्धा तातडीने दाखल घेत टँकरवर पाण्याचा मारा केला या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.     (वार्ताहर)

Web Title: Empty tanker laps; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.