कुटुंबातूनच मिळाले लेखनासाठी प्रोत्साहन
By admin | Published: July 2, 2017 01:22 PM2017-07-02T13:22:59+5:302017-07-02T13:22:59+5:30
लहानपणापासून छोटय़ा गोष्टी, बालकविता, गाणी हे सारे माङया घरातच ऐकायला मिळाले. पुढे ह्या गोष्टी, कविता वाचायचा मला छंद लागला.
Next
लहानपणापासून छोटय़ा गोष्टी, बालकविता, गाणी हे सारे माङया घरातच ऐकायला मिळाले. पुढे ह्या गोष्टी, कविता वाचायचा मला छंद लागला. माङो आजोबा कै.ल.नि. छापेकर हे शिक्षणतज्ज्ञ होते. शालेय पाठय़पुस्तकात त्यांचे पाठ समाविष्ट असत. ‘मायबोलीचा अभ्यास’ ही त्यांची व्याकरणविषयक पुस्तकेही अभ्यासक्रमात होतीच. घरात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी चांदोबा, आनंद, कुमार, किशोर ही मासिके आवजरून वाचायला लावली. त्यातील शब्दकोडी सोडविण्याची सवय लावली.
मू.जे. महाविद्यालयात प्रा.राजा महाजन यांच्या अध्यापनामुळे काव्यलेखनाची आवड निर्माण झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संत साहित्य, आधुनिक कवी ह्यांचे साहित्य वाचनात आले. लेखनासाठी आई-वडील कै.विमल आणि कै.मु.द.छापेकर यांनी खूप प्रोत्साहन दिले. एखाद्या जीवलग मैत्रिणीला सांगावी, तशी माझी पहिली प्रेमकविता मी माङया आईला सांगितली. संस्कारक्षम घराण्यात असल्यामुळे ही कविता लिहावी की नाही, अशा मनस्थितीत मी होते. रात्री 11.30 वाजता माङया आईने ही अस्वस्थता अचूक हेरली आणि त्याचवेळी न कंटाळता मला कविता लिहावयास लावली.
मू.जे. महाविद्यालयात गेली 35 वर्षे मी अध्यापन करीत आहे. ह्या काळात संगीत सौभद्र : एक अभ्यास (संपादित), प्रा.सु.का. जोशी ह्यांच्या प्रेरणेने मराठी छंदविचार, सामाजिक भाषाविज्ञान (संपादित), मराठी नाटकातील स्थित्यंतर ही पुस्तके लिहिता आली. ही सारी पुस्तके विद्यापीठाचे संदर्भ-ग्रंथ म्हणून नेमली. याशिवाय अनेक छोटय़ा पुस्तिकांचे-ज्ञानेश्वरी अध्याय सातवा, मनाचे श्लोक अध्याय पहिला यांचे संपादन करता आले.
महाविद्यालयात विविध प्रसंगांच्या निमित्ताने संगीतविषयक अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन करता आले. याचे सारे श्रेय माङो कुटुंबीय (माहेरचे व सासरचेही) माङो शिक्षक, प्राध्यापक ह्यांचे प्रामुख्याने आहे. त्याचप्रमाणे अभिजात साहित्य लेखन करणारे वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज इ. साहित्यिकांचे आहे. माङया कुटुंबीयांचे आशीर्वाद, मित्र-मैत्रिणींच्या सदिच्छा, सहका:यांचे प्रोत्साहन हे सारे यापुढेही सतत माङया पाठिशी राहतील आणि त्यामुळेच मला अधिक दज्रेदार लेखन करता येईल, अशी आशा आहे.
- प्रा.चारूता गोखले