पारोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:42 IST2020-12-31T22:41:35+5:302020-12-31T22:42:26+5:30
पालिकेच्या नवीन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

पारोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : पालिकेच्या नवीन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी शहरात अतिक्रमण हटावची मोहीम राबवली.
पारोळा शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात बाजारपेठेत रत्याच्या दोन्ही बाजूनी लहान मोठे पथ विक्रेते व हातगाड्या लागलेल्या असतात.त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास जागादेखील नसते. यामुळे दररोज किरकोळ वादविवाद होतात. ही समस्या सोडविण्यासाठी पारोळा पालिकेच्या नवीन रुजू झालेल्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी दिला. अतिक्रमण करणारे विक्रेते ठेलागाडी धारकांना कडक सूचना देत यापुढे जीएसपी प्रणालीचा वापर करणार असल्याचे संकेत दिले. यामुळे ठेलागाडी व अतिक्रमण, मध्येच दुकाने लावणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
येथील मुख्य बाजारपेठेत वाढते अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. नेहमीच अतिक्रमणची ओरड होत होती. याबाबत नविन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी पदभार घेत पथ विक्रेतेसाठी निमावली लागू केली. या माध्यमातून पथ विक्रेत्यांना विविध परवाने वाटप होतील. त्यात स्थिर ,फिरते व तात्पुत्या परवान्याचा समावेश राहणार आहे. त्यासाठी विशेष जीपीएस पद्धतीने ३१डिसेंबरपासून सर्व्हेक्षण सुरू होणार आहे.
पालिका शहरातील पथविक्रेत्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारचे परवाने देणार आहेत. त्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांनुसार प्रत्येक पथ विक्रेते मोबाईल क्रमांक हा आधारकार्डशी संलग्न असावा. त्यानुसार सर्व नियमावली तयार करण्यात येईल व कायमच्या अतिक्रमणाला ब्रेक व बेशस्त पार्किंगला लगाम लागेल, असे भगत यांनी सांगितले. अतिक्रमणधारकांना कडक इशारा देत नियमांचे काटेकोरपणे अमलबजावणी केली जाईल. बेशिस्तपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही, असा दम त्यांनी भरला आहे. रोज सकाळी पाहणी करून कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी थांबून कारवाई होणार आहे. या कामात मुख्याधिकारी ज्योती भगत, अधिक्षिका संघमित्रा संदानशिव, राहुल पवार, पंकज महाजन, हिमतराव पाटील, तुकुडू नरवाले, संदीप पाटील व इतर कर्मचारी हजर होते.