पारोळा बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम केवळ नावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 08:07 PM2018-05-17T20:07:37+5:302018-05-17T20:07:37+5:30

पारोळा येथील बाजारपेठेत हातगाडी, अवजड वाहने, दुकानापुढे इतर दुकाने भाड्याने लावू देणे अशा विविध कारणांनी बाजारपेठेत साधे चालणेदेखील मुश्किल झाले होते. शहरवासीयांच्या वाढत्या तक्रारी पाहता गुरूवारी नगर पालिका व पोलीस प्रशासनातर्फे बाजारपेठत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

 Encroachment removal campaign of Parola market only Navala | पारोळा बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम केवळ नावाला

पारोळा बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम केवळ नावाला

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस आणि पालिका कर्मचाºयांचा मोठा लवाजमा अतिक्रमणे काढतांंना मुख्याधिकाºयांनी भेदभाव केल्याचा आरोप मुख्याधिकाºयांना घेराव घालत उपोषणाचा इशारा.

लोकमत आॅनलाईन
पारोळा, दि.१७ : बाजारपेठेत पालिकेतर्फे गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. तथापि ही मोहीम केवळ नावालाच राबविल्याची प्रतिक्रीया उमटत असून त्यातही भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पारोळा येथील नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेत हातगाडी, अवजड वाहने, दुकानापुढे दुकाने भाड्याने लावू देणे अशा विविध कारणांनी बाजारपेठेत साधे चालणेदेखील मुश्किल झाले होते. जणू बाजारपेठ ठप्प झाल्याचे चित्र होते. याबाबत शहरवासीयांच्या वाढत्या तक्रारी पाहता गुरूवारी नगर पालिका व पोलीस प्रशासनातर्फे बाजारपेठत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
मुख्याधिकारी सचिन माने, अभियंता , मुख्य लिपिक यांच्यासह १० /१२ कर्मचारी व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, लहारे यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यासाठी सकाळी ११:३० वाजता दाखल झाला. अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेच्या प्रवेशद्वारापासून सुरू झाली. पण नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील देखील अतिक्रमणे मुख्याधिकारी माने यांच्याकडून निघू शकली नाहीत.
पोलिसांच्या बंदोबस्तात केवळ तलाव गल्ली कॉर्नर ते व्हरायटी कॉर्नर या भागात बेवारस पडलेली एक हातगाडी व फळांचा एक कॅरेट, एक छत्री एवढ्या तीन वस्तू या (धडक?) अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, ज्या वेगाने अतिक्रमण काढले त्याच्या दुप्पट वेगाने अतिक्रमण काढणाºया अधिकारी वर्गासमोर अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले. कोणाचाही वचक अतिक्रमण धारकांवर दिसून आला नाही. त्यात अतिक्रमण हटाव मोहीम ही सरसकटपणे राबविली गेली पाहिजे होती, पण तोंड पाहून अतिक्रमणे काढण्यात आली. बाजारपेठेत अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे ठरतील अशा टपºया व दुकाने लोकांनी थाटली आहेत. त्यात बड्यांच्या अतिक्रमणाला हातही न लावता गरिबांची अतिक्रमणे का काढली जातात असा प्रश्न भाजीपाला विक्रेता सुदाम पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर सरसकट सर्वांची अतिक्रमणे काढण्याची हिंमत मुख्यधिकारी माने यांनी दाखवावी असे खडे बोल या वेळी माने यांना सुनविण्यात आले. मुख्याधिकारी माने यांच्या उपस्थितीत रणरणत्या उन्हात दुकानाच्यावर सावलीसाठी लावण्यात आलेल्या हिरव्या नेट, झेंडे, अशी ही काही ठराविक अतिक्रमणे काढण्यात आली. तेव्हा काही दुकानदारांनी मुख्याधिकारी यांना घेराव घालत भेदभाव न करता सर्व अतिक्रमणे सरसकट काढा असे सुचविले, नाही तर आताच नगर पालिकेसमोर उपोषणाला बसू असा इशाराच दिला. पोलिसांचा व नगर पालिका प्रशासन यांचा लवाजमा अतिक्रमण काढण्यासाठी आणूनही ते केवळ शो पीस ठरल्याचे तसेच नावाला अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्याचे शहरवासीयांनी बोलून दाखविले.

Web Title:  Encroachment removal campaign of Parola market only Navala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.