भडगावला पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण

By admin | Published: May 20, 2017 04:43 PM2017-05-20T16:43:34+5:302017-05-20T16:43:34+5:30

शहरातील पंचायत समिती कार्यालयापासून बसस्थानक, गिरणा पार्क कॉलनी, चाळीसगाव रस्ता

Encroachment took place in Bhadgaa police station | भडगावला पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण

भडगावला पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण

Next

ऑनलाइन लोकमत

भडगाव, जि. जळगाव, दि. 20 - भडगाव शहरातून जाणा:या राज्य महामार्ग 19वरील लहान-मोठे अनेक अतिक्रमण शनिवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.  
शहरातील पंचायत समिती कार्यालयापासून बसस्थानक, गिरणा पार्क कॉलनी, चाळीसगाव रस्ता तसेच पारोळा चौफुली ते शासकीय विश्रामगृह व न्यायालय इमारत लगत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले होते. शनिवारी सकाळी सा.बां. विभागाने तगडय़ा पोलीस बंदोबस्तात या रस्त्यांवरील दुकाने, झोपडय़ा जेसीबीद्वारे हटविण्यात आले. 
चाळीसगाव-पाचोरा मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होत होती.  ही स्थिती लक्षात घेता सा.बां. खात्यातर्फे यापूर्वीच 140 अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. नोटिसांची दखल न घेतल्याने 20 रोजी ही मोहीम राबविण्यात आली. यात अतिक्रमणधारकांची कच्ची-पक्की बांधकामे, दुकाने, हॉटेल, शिवसेना कार्यालयासह सर्व ठिकाणी जेसीबी मशीनने अतिक्रमणे हटविण्यात आली. पोलिसांनीही आदल्या दिवशी रात्रीच अतिक्रमणधारकांना  सूचना दिल्या होत्या. यानंतर काही अतिक्रमणधारकांनी रात्री व सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. ट्रॅक्टर, रिक्षातून आपापले साहित्य वाहून नेले. रस्त्यापासून 15 मीटर दुतर्फा अतिक्रमण हटविल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Encroachment took place in Bhadgaa police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.