खान्देशात कर्जमाफीची प्रतीक्षा संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:32 AM2017-11-20T05:32:38+5:302017-11-20T05:32:57+5:30
जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.
जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहात असल्याने कर्जमाफी रखडली आहे. धुळ्यात फक्त १३ शेतकरी
जिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. या कर्जमाफीसाठी पात्र शेतक-यांच्या पहिली ग्रीन यादी प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतक-यांचेच कर्ज माफ झाल्याची माहिती आहे.
>नंदुरबार २६५ शेतकरी
४७ हजार अर्जांपैैकी २० हजार शेतकरी पात्र ठरविले गेले होते़ यातील २६५ शेतकºयांच्या कर्जमुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून दिली.
>शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्यात आलेल्या रकमेतून कर्जमुक्तीचे कामकाज सुरू आहे़ येत्या काळात शासनाकडून उर्वरित शेतकºयांच्या कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे़ बँकांनी शेतकºयांच्या कर्जमुक्तीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
- संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबाऱ