गिरणा नदीच्या आवर्तनाचा ‘दि एन्ड ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:58 PM2018-11-21T21:58:44+5:302018-11-21T22:03:59+5:30
गिरणेच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पोहोचले व पहिल्या आवर्तनाची सांगता झाली.
एरंडोल : सोमवारी पहाटे गिरणेच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पोहोचले व पहिल्या आवर्तनाची सांगता झाली. त्यामुळे पाटबंधारे यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. त्यापूर्वी गिरणा नदी पात्रात सुमारे ४० मीटर रुंदीचा खड्डा भरायला भरपूण पाणी लागले.
फुफनगरीच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी १८ नोव्हेंबरच्या रात्री वाळूचा बंधारा व पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दहिगाव बंधाऱ्यापासून आवर्तनाचे पाणी बंद झाले.
प्रचंड वाळू उपसा झाल्यामुळे नदी पात्रात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पाणी साचले. त्यामुळे प्रवाहाचा वेग मंदावला. या आवर्तनाला १४०० दलघफू पाणी सोडण्यात आले. १६० खेडी, २ न.पा. याप्रमाणे जवळपास १० ते १२ लाख लोक संख्येला पाण्याचा लाभ मिळाला.