मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:12 PM2019-05-08T12:12:12+5:302019-05-08T12:12:36+5:30

आधीच एक हजारहून जागा आहेत रिक्त

At the end of May, 54 employees will be retired | मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

Next

जळगाव : महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दुसरीकडे ३१ मे पर्यंत मनपाचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच वर्षापूर्वी स्थायी समितीच्या मंजुूरीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
मनपात प्रत्येक वर्षी ७० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. एकूण २८०० कर्मचाºयांची गरज असताना मनपात सध्या १७५० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १ हजारहून अधिक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत.
कर्मचारीअभावी मनपातील अनेक कामांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मनपाचे क्षेत्र प्रत्येकवर्षी वाढत आहे. मात्र, कर्मचारी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.
२०११ मध्येच १११ जणांची केली होती भरती
मनपाची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर केवळ २०११ मध्ये १११ जणांची भरती केली असून, त्या ऐवजी एकही वेळेस रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.
महापालिका झाल्यानतंर आस्थापनेतील कर्मचाºयांचा विभागनिहाय आकृतीबंधात देखील बदल करणे आवश्यक होते. मात्र, १५ वर्षांपासून मनपाने यामध्ये बदल देखील केला नाही. राजेंद्र पाटील आस्थापना अधिक्षक असताना महापालिका कर्मचाºयांचा आकृतीबंध तयार करण्यात आला.
आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखा प्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. नगरसचिव विभागात २ लिपीक वाढविण्यात आले.
प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली होती.
मनपातील कर्मचाºयांना दिले जाताहेत पदे
मनपात अनेक कर्मचाºयांसह अधिकाºयांची पदे देखील रिक्त आहेत. यामध्ये अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, ३ सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर मनपाकडून मनपातील क्लार्क, लिपीक, अभियंताना ही पदे देण्यात आली आहे. अनेकदा पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाºयांना पदभार देवून प्रभारी कारभारी करुन काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र मनपात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. बहुतांश कारभारी प्रभारी असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.
कंत्राट पध्दतीने भरणार जागा
शासनाकडून आकृतीबंधाला मंजूरी मिळाली नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटीपध्दतीने कर्मचारी भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, या ठरावावर अंतीम प्रक्रिया झाली नसून, या प्रक्रियेला अजून सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचाºयांचा जागा भरल्या तर मनपाच्या कामात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

Web Title: At the end of May, 54 employees will be retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव