पाण्यासाठी उतरलेल्या प्रवाशाचा रेल्वेखाली अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:55 AM2018-04-09T04:55:27+5:302018-04-09T04:55:27+5:30

पाण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशाचा रेल्वेखाली सापडून करुण अंत झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली.

 The end of the train passed down to the water | पाण्यासाठी उतरलेल्या प्रवाशाचा रेल्वेखाली अंत

पाण्यासाठी उतरलेल्या प्रवाशाचा रेल्वेखाली अंत

Next

जळगाव : पाण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशाचा रेल्वेखाली सापडून करुण अंत झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली.
नागपूर-मुंबई १२२९० दुरांतो एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्री २च्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३वर थांबली होती. या वेळी एस-८ क्रमांकाच्या बोगीतील मोहम्मद बद्रुद्दीन मोहम्मद सुलेमानी (६५) हे पाणी आणण्यासाठी खाली उतरले होते. पुन्हा डब्याकडे परतत असतानाच सुरू झालेली गाडी पकडण्याच्या प्रयत्नात सुलेमानी हात निसटून खाली पडले आणि फलाट व रेल्वेमध्ये अडकले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title:  The end of the train passed down to the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.