जळगावात अभियंत्याची महापौरांशी अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:25 PM2017-08-19T12:25:10+5:302017-08-19T12:26:24+5:30
आरोग्य विभागात बदली केल्याने संताप : नगरसेवकांशीही ‘अरे तुरे’ ची केली भाषा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - बांधकाम विभागातून आरोग्य विभागात बदली केल्याचा राग आल्याने पाणी पुरवठा विभातील कनिष्ठ अभियंता जितेंद्र सुकदेवराव यादव यांनी शुक्रवारी महापौर नितीन लढ्ढा यांना बदलीस जबाबदार धरत त्यांच्याशी हुज्जत घातली. महापौरांच्या दालनात त्यांनी अरेरावीची भाषा केली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापौर नितीन लढ्ढा यांनी तातडीने संबधित अभियंत्याचा निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे.
मनपा स्थायी समितीची सभा संपल्यानंतर शुक्रवारी महापौरांच्या 17 व्या मजल्यावरील दालनात महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, संदेश भोईटे, चेतन शिरसाळे आदी चर्चा करत बसले होते. या दरम्यान मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता जितेंद्र यादव हे तेथे तावातावाने आले. आत आल्या आल्या त्यांनी महापौर नितीन लढ्ढा यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. बांधकाम अभियंत्याचे आरोग्य विभागात काम नसताना माझी त्या विभागात बदली का केली ? असे ते जोरजोराने विचारत होते. त्यावर महापौर लढ्ढा यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रय} करत बदल्या मी करत नाही ते अधिकार आयुक्तांचे असतात असे समजविण्याचा प्रय} केला.
याबाबत आयुक्तांकडे तक्रार करावी असा सल्ला महापौर लढ्ढा यांनी यादव यांना दिला. मात्र यादव यांनी काहीही एकून न घेता जोरजाराने बालणे सुरूच ठेवत महापौरांच्या सांगण्यावरून माझी आरोग्य विभागात बदली केली असून, माझी बदली रद्द करा अशी मागणी केली. काही कर्मचा:यांनी या ठिकाणी येऊन यादव यांना बाहेर नेले.