भाजीपाला विक्रीतून मुलाला केले अभियंता

By admin | Published: May 14, 2017 06:17 PM2017-05-14T18:17:31+5:302017-05-14T18:17:31+5:30

आशाबाई सावळे यांनीही पाहिले होत़े पतीच्या निधनानंतरही त्यांनी या स्वप्नाची पूर्ती करुन भाजीपाला

Engineer made son from vegetable sale | भाजीपाला विक्रीतून मुलाला केले अभियंता

भाजीपाला विक्रीतून मुलाला केले अभियंता

Next

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 14 - मुलांनी शिकून मोठे व्हावे, आई-वडीलांचे नाव उज्वल करावे, अशी सर्व सामान्य पालकांची इच्छा नव्हे स्वप्न असत़े असेच काहीसे स्वप्न नंदुरबार येथील आशाबाई सावळे यांनीही पाहिले होत़े पतीच्या निधनानंतरही त्यांनी या स्वप्नाची पूर्ती करुन भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून आपल्या मुलांना शिकवित अभियंता केल़े
नंदुरबार येथील रहिवासी आशाबाई खंडू सावळे यांचे पती खंडू  सावळे यांचे 2007 साली अचानक हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल़े घरची परिस्थिती जेमतेम त्यातच पतीच्या निधनानंतर सासरच्यांनीही पाठ फिरविल्याने पुरत्या खचलेल्या आशाबाई सावळे यांनी बदलत्या काळानुसार स्वताला सावरल़े पतीचे निधन झाले म्हणून खचून न जाता त्यांनी मोठय़ा उमेदीनं आणि धाडसान कल्पेश खंडू सावळे व केतन खंडू सावळे या आपल्या दोन लेकरांना भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून राबराब राबून लहानच मोठ केलं़ आपल्या वडीलांचे निधन झाले असल्याने पितृछत्रही याच मातेन त्यांना देत कधीही वडीलांची कमतरता जाणवू दिली नाही़ सध्या अभियांत्रिकीला लागणा:या खर्चाची परवा न करता आपला मुलगा कल्पेश यास नाशिक येथील प्रतिष्ठीत महाविद्यालयात संगणक अभियंता या विभाग प्रवेश घ्यायला लावल़े मुलानंही आल्या आईच्या हातावरील काबाड कष्ट करुन आलेल्या फोडांवर अभियांत्रिकीच्या डिग्री रुपाने फूंकर मारुन आपल्या मुलानं अभियंता व्हाव हे स्वप्न साकारल़ हा सर्व भूतकाळ सांगत असताना आशाबाईची छाती अभिमानाने फुलली होती़ डोळ्यात आनंदाचे अश्रु तरळतांना दिसून येत होत़े आशाबाईंचा दुस:या मुलानेदेखील नुकतीच बारावीची परीक्षा दिली आह़े यानंतर त्यानेसुध्दा आपल्या मोठय़ा भावासारखे अभियंता होण्याचे स्वप्न सांगितले आह़े गेल्या 15 वर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन ते आपला चरितार्थ चालवित आहेत़ सासरच्यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या लढय़ात त्यांना आई-वडील, दोन भाऊ यांनीही सक्षमपणे साथ दिल्याचे त्यांनी सांगितले आह़े संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात गेल्यानंतरही त्यांनी जोर्पयत काम होईल तोर्पयत काम करीत राहण्याचा संकल्पदेखील केला आह़े

Web Title: Engineer made son from vegetable sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.