अभियंता नाईक यांचा पदभार काढला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:07 PM2020-03-04T12:07:35+5:302020-03-04T12:08:14+5:30

जळगाव : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांचा पदभार काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून बुधवारी ...

 Engineer Naik takes over? | अभियंता नाईक यांचा पदभार काढला?

अभियंता नाईक यांचा पदभार काढला?

Next

जळगाव : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांचा पदभार काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे़
या पूर्वी दोन सभांमध्ये ठराव
अभियंता नाईक यांच्या कार्यमुक्तीचा या आधीच्या दोन सभांमध्ये ठराव झाला होता़ जि़ प़ चा निधी जलशक्तीसाठी परस्पर वळविल्याचा व सभागृहाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत हे ठराव होते़ तोच धागा पकडत मंगळवारच्या सभेत नाईक यांना आताच कार्यमुक्त करा अशी मागणी नंदकिशोर महाजन यांनी केली व सर्व सदस्यांनी टेबल वाजवून होकार दर्शविला, सदस्यांचा हा पवित्रा बघून अखेर ह्यकार्यमुक्त करतोह्ण अशा शब्दात सीईओंनी आदेश दिले़ मात्र, थेट कार्यमुक्तीचे अधिकारी मंत्रालय स्तरावरच असतात, असा विषय समोर आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. अखेर नाईक यांच्याकडून पदभार काढण्याचा निर्णय सायंकाळी झाल्याचे समजते़
ह्यस्पीलह्णचे गौडबंगाल... लघुसिंचनची देणी ही साडे सात ते आठ कोटींची कशी असा सवाल नानाभाऊ महाजन यांनी केला ़ जलयुक्त शिवार योजनेची सर्वाधिक कामे जळगावात झाल्याचा दावा नाईक यांनी केला़

Web Title:  Engineer Naik takes over?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.