जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 06:41 PM2018-08-09T18:41:03+5:302018-08-09T18:43:09+5:30

गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे.

An engineering student in Jalgaon | जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा

Next
ठळक मुद्देगुलाबराव देवकर महाविद्यालयातील विद्यार्थ्याची फसवणूकबुकींग करुनही मिळाला नाही मोबाईलविद्यार्थ्याने दिली जिल्हापेठ पोलिसात तक्रार

जळगाव : गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे.
फुसे या विद्यार्थ्याने मोबाईलची बुकींग केल्यानंतर सुरुवातीला दोन हजार रुपये आॅनलाईन भरले. त्यानंतर दुसºया टप्प्यात साडे चार हजार रुपये भरले. मोबाईल घेऊन कुरीयर एजन्सीची व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहचेल असे सांगण्यात आले. थोड्या वेळाने कुरीयर एजन्सीच्या राजू नावाच्या कर्मचाºयाने वाहन नादुरुस्त झाले आहे, तुम्ही पैसे अपूर्ण भरले आहेत ते पूर्ण भरा, अन्यथा तुमचे पैसेही मिळणार नाहीत व मोबाईलही मिळणार नाही असे या कर्मचाºयाने धमकावले. या भीतीमुळे फुसे याने आणखी दोन टप्प्यात रक्कम भरली. एकूण १५ हजार रुपये भरल्यावरही मोबाईल मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फुसे याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. तेथे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी फुसे याचीच पोलिसांनी हजेरी घेत खडे बोल सुनावले.

Web Title: An engineering student in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.