इंजिनिअर्स डे विशेष : अभियांत्रिकी क्षेत्र अधिक विस्तारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:27 PM2020-09-14T14:27:41+5:302020-09-14T14:30:05+5:30

नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.

Engineers' Day Special: The field of engineering will expand further | इंजिनिअर्स डे विशेष : अभियांत्रिकी क्षेत्र अधिक विस्तारणार

इंजिनिअर्स डे विशेष : अभियांत्रिकी क्षेत्र अधिक विस्तारणार

Next
ठळक मुद्देमुलींचेही प्रमाण वाढलेनॅनोटेक्नॉलॉजी होणार व्यापक अभियंत्यांचा सूर

जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव, जि.जळगाव : तंत्रज्ञानाच्या कक्षा झपाट्याने विस्तारल्या जात आहे. याला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. अभियांत्रिकी क्षेत्राच्या परिघातही असे अनेकविध नवे बदल दिसून येत आहे. मुलींचादेखील या क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.
प्रसिद्ध अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. गत १० वर्षात अभियांत्रिकी वर्तुळात मोठे बदल झाले आहे. अभ्यासक्रम स्मार्ट झाला आहे. त्यामुळे कामाच्या पद्धतीतदेखील बदल अधोरेखित झाले. मात्र संगणकाचा शिरकाव झाल्याने कठोर मेहनत, ड्राईंगसाठी हातांचा उपयोग कमी झाला आहे. पूर्वी एखाद्या ड्राईंगमध्ये काही चूक असल्यास ते नवीन रेखाटण्याशिवाय पर्याय नव्हता. तथापि, संगणक, इंटनेटमुळे यावर मात करता आली आहे. 'अ‍ॅटोकॅड' सॉफ्टवेअरमुळे एकच ड्राईंग पुन्हा पुन्हा वापरणे शक्य झाले आहे. असे अनेक नावीन्यपूर्ण बदल यात झाले आहे. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव जाणवतो, असे निरीक्षणही अभियंत्यांनी नोंदविले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील गुणांमुळे 'उत्तीर्ण' होणे सोपे झाले असल्याचेही अभियंत्यांचे म्हणणे आहे.

अ‍ॅडव्हान्स नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर
पूर्वी मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व सिव्हील या तीन शाखांचा अभियांत्रिकीमध्ये समावेश होता. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षात या खिडक्या उघडल्या असून हे क्षेत्र अधिक विकसित होत आहे. अगामी काळात नॅनोटेक्नॉलॉजी, मेकॅक्ट्रॉनिक्स आणि मल्टिटास्किंग पद्धतीतील बदल आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील विकास असणार आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक आणि परिश्रम करण्याची तयारी असणाºया तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

विषयांची संख्या वाढली
अभियंत्यांमुळे देश ओळखला जात आहे. विषयांची संख्या वाढली आहे. कृषी, पर्यावरण क्षेत्रातही अभियांत्रिकी पाऊलखुणा उमटू लागल्या आहे. ‘आयटी’तील प्रगतीमुळे वेगाने बदलही होत आहे.
पुढील काळात गुणवत्ताप्रधान व पर्यावरणाचा समतोल राखणारे बदलही अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे व योग्य मनुष्यबळ निर्मितीला महत्व असणार आहे. मायक्रो प्रॉडक्टव्दारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाºया नॅनोटेक्नॉलॉजीला महत्व असेल.
थ्रो आऊटचा शिरकाव अभियांत्रिकी क्षेत्रातही झाला आहे. त्यामुळे पुढील काळात मोठ्या संगणकांची गरज भासणार नाही. हातात मावेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मुभा असावी, अशी अपेक्षादेखील अभियंत्यांनी व्यक्त केली.


स्पर्धा परीक्षांकडे अधिक कल
अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने इंजिनिअर्सचे लोंढे बाहेर पडत आहे. हुशार आणि चतुरस्र इंजिनिअर्स स्पर्धा परीक्षांची वाट धरतात. त्यामुळे या क्षेत्रातील गुणवत्ताधारक मनुष्यबळ कमी होत आहे. इंजिनिअर्सची संख्या वाढल्याने बेरोजगारीची समस्या ऐरणीवर आली आहे. लॉकडाऊनचा फटकाही दीर्घ काळ जाणवणार आहे.
- सुधाकर पालवे, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.


बांधकाम क्षेत्रात झाले बदल
अभियांत्रीकीतील नावीन्यपूर्ण बदलांचे ठसे बांधकाम क्षेत्रात उमटले आहे. सॅटेलाईटव्दारे सर्वेक्षण, कमी मनुष्यबळाचा वापर करुन धरणे, रस्ते, मोठे प्रकल्प उभारले जात आहे. यामुळे शासनाच्या पैशांसह वेळेचीही बचत होत आहे. बांधकांमध्ये यंत्राचा वापर होऊ लागल्याने कामे लवकर होताहेत. लॉकडाऊनमुळे घडी विस्कटली आहे.
- सुनील बी. भावसार, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.

Web Title: Engineers' Day Special: The field of engineering will expand further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.