सुधारीत बदल्यांच्या आदेशाने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:39 PM2018-06-01T12:39:22+5:302018-06-01T12:39:22+5:30

तगाद्याने राज्य समन्वयक वैतागले

Enhanced transfers command teacher problems | सुधारीत बदल्यांच्या आदेशाने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या

सुधारीत बदल्यांच्या आदेशाने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या

Next
ठळक मुद्देपोलीस कारवाईचा इशारादाद कुणाकडे मागावी

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत घोळ झाल्याने संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ७३७ शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारीत आदेश नुकतेच पारीत केले आहे. मात्र या आदेशातदेखील प्रचंड घोळ झाला असून पती-पत्नी एकत्र करणातील शिक्षकांचीच उचलबांगडी झाल्याने अनेक शिक्षक वैतागले आहे. त्यातच शिक्षकांना कुठेच दाद मिळत नसल्याने त्यांनी थेट पुण्याचे एनआयसी सेंटर गाठले. यामुळे राज्याचे बदली समन्वयक प्रदीप भोगले यांची डोकेदुखी वाढली असल्याने त्यांनी थेट शिक्षकांवर पोलीस कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे. तसे पत्रदेखील शासनाने सीईओंना पाठविले आहे.
१८ मे रोजी बदलीचे आदेश मिळालेल्या शिक्षकांची नावे विस्थापित शिक्षकांच्या यादीतही आल्याने त्यांची आधीच्या बदली आदेशाने दिलेली पदस्थापना रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ७३७ शिक्षकांना सुधारीत बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शिक्षकांच्या सुधारीत आदेशातदेखील प्रचंड घोळ झाला आहे. विस्थापीतांच्या सुधारीत आदेशात अनेक नविन शिक्षकांची नावेदेखील यात वाढविण्यात आली आहे. त्यातच पूर्वी ज्या शिक्षकांचे पती-पत्नी एकत्रीकरण करण्यात आले होते व बदली झाली होती त्यात आता सुधारीत आदेशाने पतीची बदली दुसरीकडे तर पत्नीची बदली दुसरीकडे करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. काही शिक्षकांना तर नवीन फॉर्म भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. सुधारीत आदेशातदेखील अनेकांच्या बदल्या एनआयसीने रद्द केल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.
दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ होत असल्याने यावर्षी शासनाने आॅनलाईन बदल्यांचे धोरण सुरू केले आहे. मात्र आॅनलाईन बदल्यांमध्येदेखील यावर्षी सर्वाधिक डोकेदुखी ठरली आहे. जून महिना उजाडत असला तरी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटता मिटत नसल्याची चिन्हे आहे.
समन्वयक वैतागले
सुधारीत आदेशातदेखील प्रचंड घोळ होत असल्याने शिक्षकांची वेगवेगळ्या ठिकाणी उचलबांगडी होत आहे. त्यातच सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी थेट एनआयसीकडे बोट दाखवित असल्याने शिक्षकांनी थेट पुणे येथील एनआयसी सेंटर गाठायला सुरूवात केली. त्यामुळे दररोजच्या तक्रारीने बदली समन्वयक वैतगाले आहे. दररोज शिक्षक समन्वयकांना फोन करून विचारणा करत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
कारवाईचा ईशारा
शासनाने ३१ रोजी राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देवून शिक्षकांच्या तक्रारीची बाब मांडली आहे. शिक्षक हे रोज एनआयसी पुणे येथे राज्य समन्वय प्रदीप भोसले यांच्याकडे जावून गर्दी करीत असून कामात व्यत्यय आणत आहे. तसेच दूरध्वनी वरूनदेखील विचारणा करीत आहे. त्याम्ुाळे आपल्या स्तरावरून शिक्षकांना सूचना करण्याचे आदेश आज अव्वर सचिवांनी सीईओंना दिले आहे. तसेच यापुढे एनआयसीमध्ये शिक्षक आल्यास पोलीस कारवाई करण्याचादेखील इशारा दिला आहे.
दाद कुणाकडे मागावी - रवींद्र सोनवणे
गेल्या २५ वर्षात शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जेवढा घोळ झाला नाही तेवढा आॅनलाईन बदल्याच्या प्रक्रीयेत होत आहे. सुधारीतच्या नावाखाली आता पारदर्शकेतेवर शंका आहे. सीईओ व शिक्षणाधिकारी दाद देत नाही व एनआयसीकडे धाव घेतली तर त्यांच्याकडूनदेखील शिक्षकांवर पोलीस कारवाईची धमकी दिली जात असल्याने दाद मागायची कुणाकडे ? लोकशाहीच्या नावाखाली मोगलाई सुरू असल्याचा आरोप जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी केला आहे.

Web Title: Enhanced transfers command teacher problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.