शिरसोली येथे मराठा व हटकर समाज मेळाव्यात शिक्षण व संघटनावर प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:28 PM2018-01-01T17:28:50+5:302018-01-01T17:37:13+5:30
दक्षिणी मराठा समाज व हटकर समाजाचा मेळावा शिरसोली येथे नुकताच झाला. यावेळी समाजातील संघटन व शिक्षणाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
आॅनलाईन लोकमत
शिरसोली, ता.जळगाव, दि.१ : येथील दक्षिणी मराठा समाज व हटकर समाजाचा मेळावा शिरसोली येथे नुकताच झाला. यावेळी समाजातील संघटन व शिक्षणाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठा समाज व हटकर समाजातर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दक्षिणी मराठा समाजातर्फे सत्कार कार्यक्रम
दक्षिणी मराठा समाजातर्फे शिरसोली प्र.न. येथे २९ रोजी घेण्यात आलेल्या मेळाव्यात सत्कार व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा उद्योजक विकास मंडळाचे सचिव विष्णु बाळदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक संचालक सतीश देवकर, डॉ.धनंजय बेंद्रे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, सरपंच माया बोबडे, मराठा समाज जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष उमाजी पानगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय सूर्यवंशी यांनी तर आभार गणेश बोबडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विजय मराठे, विलास बोबडे, शांताराम ढेंगळे, भगवान जाधव, वाल्मिक साबळे, पंढरीनाथ बोबडे, किशोर चौथे, भागवत मराठे, भागवत धामणे यांनी परिश्रम घेतले.
हटकर समाज मंदिरासाठी १० लाखांचा निधी
हटकर समाज प्रगती संस्थेतर्फे रविवार ३१ रोजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर सदाशिव ढेकळे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, शेतकी संघाचे संचालक राजु धर्मा पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र कोळी, माजी उपसरपंच शेनफडू पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, अनिल बारकू पाटील, हटकर समाज प्रगती संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण वराडे, आर.के.पाटील, शिरसोली सरपंच यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हटकर समाज मंदिरासाठी १० लाखांच्या निधीची घोषणा केली.