जळगावातील करमणूक कर विभाग बंद होणार

By admin | Published: June 15, 2017 12:43 PM2017-06-15T12:43:27+5:302017-06-15T12:43:27+5:30

लवकरच जीएसटी लागू होणार असल्याने हा कर महापालिकेकडे जमा होईल व मनपाकडून तो पालिकांना दिला जाईल.

The entertainment tax department in Jalgaon will be closed | जळगावातील करमणूक कर विभाग बंद होणार

जळगावातील करमणूक कर विभाग बंद होणार

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 -  जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेला करमणूक कर विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या विभागातील कर्मचा:यांबाबत विभागीय आयुक्तांकडून माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच जीएसटी लागू होणार असल्याने हा कर महापालिकेकडे जमा होईल व मनपाकडून तो पालिकांना दिला जाईल.
वर्षाकाठी महसूल विभागास 8 ते 10 कोटींचा महसूल एकटय़ा करमणूक कर विभागाकडून मिळत असतो. करमणुकीची साधने असलेली चित्रपट गृहे व अन्य साधनांकडून करमणूक कर वसूल केला जात असतो.
जिल्ह्यात बहुविध चित्रपटगृहे 2, एक पडदा 15, स्थायीवत 5 फिरती चित्रपटगृहे 3 अशी एकूण 25 चित्रपटगृहे, व्हिडीओ प्रदर्शन केंद्र 4, मनोरंजन उद्यान 1, व्हिडीओ गेम 4 व 12 ते 15 हजार केबल ऑपरेटरकडून वर्षाकाठी 8 ते 10 कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाकडे जमा होत असतो.
करमणूक कराचे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यालय आहे. तहसीलदार दर्जाचा अधिकारी या कार्यालयाचा प्रमुख असतो. जिल्ह्याच्या ठिकाणी पाच ते सहा कर्मचारी तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात करमणूक कर विभाग असतो. तालुक्याचे नियोजन या कार्यालयामार्फत चालते.
जीएसटीमुळे बदल
राज्यात 1 जुलै पासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होत आहे. हा कर जमा करण्याचे मुख्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जळगाव येथे असेल. जीएसटी अंतर्गत करमणूक कर वसुलीची जबाबदारी ही महापालिकेकडे येण्याचे संकेत आहेत. तेथून कराची रकम संबंधित पालिकांकडे वर्ग केली जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला करमणूक कर विभाग हा बंद  होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेला हा विभाग लवकरच बंद होणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडून जिल्हा प्रशासनास सूचना प्राप्त झाल्या असून या विभागातील कर्मचा:यांची सेवा अन्य विभागांमध्ये वर्ग केली जाणार आहे.

Web Title: The entertainment tax department in Jalgaon will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.