एसएसबीटीत पालक मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:54+5:302021-07-26T04:16:54+5:30

फोटो - २६ सीटीआर २२ जळगाव - एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा ऑनलाइन पद्धतीने झाला. यावेळी मेळाव्याचे उद्घाटन ...

Enthusiastic parents meet at SSBT | एसएसबीटीत पालक मेळावा उत्साहात

एसएसबीटीत पालक मेळावा उत्साहात

Next

फोटो - २६ सीटीआर २२

जळगाव - एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा ऑनलाइन पद्धतीने झाला. यावेळी मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के.एस.वाणी, डॉ.संजय शेखावत, डॉ.जी.के. पटनाईक, प्रा.कृष्णा श्रीवास्तव यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर पटनाईक यांनी कोरोना काळात महाविद्यालयाने राबवलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मेळाव्यामध्ये विद्यापीठस्तरीय परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ३०० पालक ऑनलाइन उपस्थित होते. या वेळी योगेश बारी, स्मिता निंबाळकर, कोमल शर्मा, उर्मिला सूर्यवंशी, ए.के. पाटील आणि रचना परमार या पालकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सारिका पवार व डॉ सरोज शेखावत यांनी केले व आभार डॉ.एन.वाय. घारे यांनी मानले.

०००००००००००००००

मूल्यवर्धन शिक्षणाचे धडे

जळगाव - रायसोनी नगर येथील जे. के. इंग्लिश स्कूलमध्ये विध्यार्थ्यांना संस्कारक्षम धडे देण्यात आले. यावेळी जगन्नाथ यात्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका ज्योती श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी असे ६० जणांनी मूल्यवर्धन शिक्षणाचे धडे घेतले. यशस्वीतेसाठी गौरव बारसे, पूजा पवार, संस्कृती श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले.

०००००००००००००००

निसर्गाशी जुळूया-ज्ञान मिळवूया उपक्रम

जळगाव - प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘निसर्गाशी जुळूया-ज्ञान मिळवूया’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षक मनोज भालेराव यांनी उपक्रमांतर्गत पानांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यात त्यांनी पानाचा आकार, पानाचा रंग यांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

Web Title: Enthusiastic parents meet at SSBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.