उद्योजक अनिल जैन यांचा 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ' ने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:23+5:302021-08-22T04:21:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना 'एनर्जी अँड एनव्हायर्मेंट फाऊंडेशनतर्फे 'ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड ' ने गौरविण्यात आले. ऑनलाईन झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात शनिवारी त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ऊर्जा व पर्यावरण फाउंडेशनचे हे व्हर्च्युअल फोरम असून त्यांनी दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, हा पुरस्कार म्हणजे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दुरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली केलेल्या चार दशकांहून जास्त काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची पावतीच असल्याचे मत अनिल जैन यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त बॅरी ओ' फॅरेला ए.ओ., नेदरलँडसचे राजदूत मार्टेन व्हॅन डेन बर्ग, पॉवर फिनान्स कॉर्पोरेशन लि. चे माजी व्यवस्थापक डॉ. व्ही. के. गर्ग, केंद्र सरकारचे माजी सचिव अनिल राझदान आदी उपस्थित होते.