जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे

By सुनील पाटील | Published: February 28, 2023 07:04 PM2023-02-28T19:04:22+5:302023-02-28T19:04:45+5:30

उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

entrepreneurs exhausted the municipality's 18 crores; Deposits made to the administration for the benefit of Abhay Yojana in jalgaon | जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे

जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे

googlenewsNext

जळगाव : सर्वसामान्य मालमत्ताधारकांप्रमाणे एमआयडीसीतील उद्योजकांनी महापालिकेचे १७ कोटी ७६ लाख रुपये थकविले आहेत. सामान्य नागरिकांना अभय योजनेचा लाभ देण्यात आला तसाच लाभ उद्योजकांना द्यावा यासाठी ३१ मार्चपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात यावी यासाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला साकडे घातले आहे. या योजनेचा लाभ मिळाला तर शंभर टक्के थकबाकी भरण्याची हमी देखील या शिष्टमंडळाने दिली आहे.

उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मुदतवाढ उद्योजकांसाठीच नाही तर सरसकट सर्वांसाठीच लागू असल्याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी दिली. या योजनेचा लाभ घेतला तर उद्योजकांचा २ कोटी ६२ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही भरणा स्विकारला जाणार आहे

Web Title: entrepreneurs exhausted the municipality's 18 crores; Deposits made to the administration for the benefit of Abhay Yojana in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव