पीजी कॉलेजतर्फे उद्योजकता विकास कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:34+5:302021-06-09T04:19:34+5:30
जळगाव : के. सी. ई. सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्चच्या इंटरनल कॉलिटी अॅश्यूरन्स सेलच्यावतीने शनिवारी ...
जळगाव : के. सी. ई. सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्चच्या इंटरनल कॉलिटी अॅश्यूरन्स सेलच्यावतीने शनिवारी उद्योजकता विकास यावर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी मुंबई येथील डॉ. किरण तळेले यांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमधून उद्योजक कसा निर्माण होऊ शकतो याबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संयोजक प्रा.जे.व्ही.खान यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील आदींची उपस्थिती होती.
...................
केसीई अभियांत्रिकीत जागतिक पर्यावरण दिवस साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केसीई सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. के. पी राणे यांनी झूम अपद्वारे मार्गदर्शन केले. नंतर अभियांत्रिकी विभागातर्फे पर्यावरणावर आधारित ऑनलाईन २० गुणांची ऑनलाईन प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात आली. ज्यात पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत जवळपास १२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यासाठी कँपस डायरेक्टर डॉ. एस. आर.सुगंधी, डॉ. पी.ए.विखार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक यांनी परिश्रम घेतले. प्रा.ए्म.डी.साळूंखे यांनी आभार मानले.