जळगावात प्लास्टिकच्या बॉटलपासून पर्यावरण संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 07:14 PM2017-03-27T19:14:09+5:302017-03-27T19:14:09+5:30
आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
Next
आर.व्ही.ग्रुपचा उपक्रम : 200 झाडांना टाकाऊ बॉटलद्वारे पाणी
जळगाव, दि.27 - वृक्षांची होणारी कत्तल व जमिनीची धूप थांबविण्यासाठी आर.व्ही.ग्रुपद्वारे टाकाऊ प्लास्टिक बॉटलपासून ड्रिप सिस्टीम तयार करीत वृक्षांना पाणी देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आतार्पयत 200 झाडांना ग्रुपमार्फत पाणी देण्यात येत आहे.
काय आहे संकल्पना..
आर.व्ही.ग्रुपच्या सदस्यांनी टाकाऊ पाण्याच्या बॉटल्स्ला छिद्र पाडून वृक्षाला पाणी देण्यात येईल अशा पद्धतीने ड्रीप सिस्टीम तयार केली आहे. वृक्षाच्या बुंध्याजवळ ही बॉटल ठेवून त्यात रोज पाणी टाकण्यात येत असते. दिवसभर हे पाणी झाडाला मिळणार आहे. शिवाय पाण्याचे बाष्पीभवन न होता संपूर्ण पाणी झाडाला मिळणार आहे.
200 झाडांजवळ ड्रीप सिस्टींम
ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील काही हॉटेलमधून रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल संकलित करून त्या परिसरातील झाडांच्या खोडाजवळ लावल्या आहेत. या झाडांना ग्रुपचे सदस्य स्वत: पाणी टाकत असतात. तर काही झाडांची जबाबदारी ही परिसरातील नागरिकांवर सोपविण्यात आली आहे. ग्रुपने आतार्पयत पिंप्राळा, जुने जळगाव, शिवाजी नगर, मु.जे.महाविद्यालय परिसरातील 200 झाडांजवळ ही ड्रीप सिस्टीम लावली आहे.
वृक्षांची पुजा करून होळी
होळीच्या दिवशी ग्रुपने वृक्षाची कत्तल न करता पुजन केले. तसेच परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी केली होती. या रवी परदेशी, प्रदीप भोई, ऋषीकेश सोनवणे, राहुल सोनवणे, विनय अहिरे, ईश्वर पाटील, अश्विनी जाधव, पूनम परदेशी, दुर्गा ठाकूर, भुवनेश्वरी ठाकूर, रश्मी खैरनार, नेहा शिंदे, कल्याणी शिंपी,सोनाली हिवराळे यांच्यासह 39 विद्यार्थी या ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत.
काव्यरत्नावली चौकात आज कार्यक्रम
आर.व्ही.आर.ग्रुपमार्फत आता जळगाव शहरातील वृक्षांना ड्रीप सिस्टीम लावण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवार 28 रोजी सकाळी 8 वाजता काव्यरत्नावली चौकात महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते होत आहे. यावेळी नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन व ग्रुपचे सदस्य उपस्थित राहणार आहे.