दीपनगर वसाहतीत पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:06 PM2018-09-11T16:06:09+5:302018-09-11T16:06:57+5:30

 Environmental supplementary building competition in Deepanagar colony | दीपनगर वसाहतीत पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा

दीपनगर वसाहतीत पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देडीएम -३ इमारतीस स्वच्छ आणि सुंदर इमारतीचा प्रथम पुरस्कारसर्वांग सुंदर आणि स्वच्छ सेक्टर पुरस्कार पीडी आणि पीई सेक्टरला मिळाला.स्पर्धेमुुळे दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रांत असलेल्या वसाहतींमध्ये पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा घेण्यात आली.
दीपनगरचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि पर्यावरणपूरक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दीपनगर वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत ‘स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इमारत’ ही स्पर्धा घेण्यात आली. वसाहतीमधील इमारती स्वच्छ रहाव्यात, पर्यावरणपूरक कामांची कर्मचाऱ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. यासाठी अधीक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या अधिपत्याखाली एका समितीचीदेखील निवड करण्यात आली. ही समिती सर्व इमारतींना भेटी देवून इमारतीची अंतर्बाह्य तपासणी करून त्यांना गुण देणार होती. या स्पर्धेत वसाहतीमधील सर्व इमारती सहभागी झाल्या होत्या.
नुकताच या स्पर्धेचा निकाल निवड समितीकडून घोषित होऊन विजेता इमारतींना मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पुरस्कार प्राप्त इमारती सुंदर आणि स्वच्छ इमारत पुरस्कार
प्रथम- डीएम ३, द्वितीय- डीएम ४, तृतीय- ईएम ७२, उत्तेजनार्थ- सीएम -२ आणि डीएम -६
सर्वात सुंदर आणि स्वच्छ सेक्टर पुरस्कार पीडी आणि पीई सेक्टरला मिळाला.
डीएम सेक्टरच्या तीन इमारतींनी स्वच्छतेचे पुरस्कार जिंकून वसाहतीमध्ये एक आदर्श निर्माण केला. मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी पुरस्कार प्राप्त इमारतवासीयांचा विशेषत: महिला वर्ग आणि बालकांचा गौरव करून आपल्या वसाहतीमधील सर्व इमारती आणि सेक्टर हे स्वच्छ आणि सुंदर असावयास हवे. व्यवस्थापन आपली जबाबदारी पार पाडेलच, परंतु ही वसाहत माझी आहे, ही इमारत माझी आहे, हे सेक्टर माझे आह,े ही भावना जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अधीक्षक अभियंता एम.बी.पेटकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली उन्मेष गिरगावकर, मनोहर पाचपांडे, श्रीचंद राठोड, सुरेंद्र यावले, योगेश खाडे यांनी भूमिका पार पाडली.





 

Web Title:  Environmental supplementary building competition in Deepanagar colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.