शाळांमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंक्षण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:01+5:302021-08-22T04:21:01+5:30

जळगाव - शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांची रक्षाबंधन व संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या ...

Environmentally friendly protection in schools | शाळांमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंक्षण साजरा

शाळांमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंक्षण साजरा

Next

जळगाव - शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांची रक्षाबंधन व संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या होत्या. शिवाय काही दक्षिणात्य ओनम सण साजरा करण्यात आला.

ब.गो.शानभाग विद्यालय

बहिण भावाच्या नात्याचे प्रतिक, प्रेम, आणि आपुलकी दृढ करण्यासाठी, रेशमाच्या धाग्यातून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व समजण्यासाठी शनिवारी ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिन आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे, शशिकांत पाटील, जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी टाकाऊपासून टिकाऊ राखी बनविणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात २१९ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला. तर तन्मय कोळी, तन्मय सोनवणे, अर्चित फडणीस, नंदिनी देसले, नयना मुलमुले, श्रेया महाजन, वैभव पाटील, स्पर्शजा नेमाडे, प्रज्ञा भामेरे, खुशी लुंकड या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळविले़ सूत्रसंचालन प्रियंका पाटील व अनिता शर्मा यांनी केले तर प्रास्ताविक नयना चिंचोले यांनी केले. मनोज पाटील, संजय यादव, जितेद्र पाटील, केतन कोल्हे व रवींद्र सैदाणे यांनी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.

००००००००००००

प.वि.पाटील विद्यालय

रक्षाबंधननिमित्त प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी घरी राहून टाकाऊ पासून टिकाऊ कसे तयार करावे याचेच एक उदाहरण म्हणून सुंदर अशा राख्या तयार केल्या. या राख्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्रॉ, कापूस, दोरा, लोकर, रंगीत मणी या अशा विविध साहित्यांचा वापर केला. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले. स्वाती पाटील व अशोक चौधरी यांनी परिश्रम घेतले.

००००००००००००

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संहिता जोशी या विद्यार्थिनीने भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण हे गीत आपल्या सुमधूर आवाजात सादर केले त्यानंतर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, संस्कृत दिनाचे महत्व सांगितले़ योगनंदिनी माळी या विद्यार्थिनीने सणाची पारंपारिक कथा आणि माहिती सांगितली. वरद कुलकर्णी या विद्यार्थ्याने भारतीय संस्कृतीतील संस्कृत भाषेचे महत्त्व संस्कृत मधून सांगितले़ त्यानंतर त्यानंतर शिक्षक बंधू-भगिनींचा रक्षाबंधन सोहळा पार पडला. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि समन्वयक गणेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.

००००००००००००००

उज्ज्वलमध्ये दक्षिणात्य ओनम व रक्षाबंधन साजरी

उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलतर्फे शाळेत दक्षिणात्य ओनम तसेच रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकांनी दक्षिणात्य वेशभूषा परिधान केली होती. यावेळी ओनमनिमित्ताने विविध खाद्यपदार्थ सर्व शिक्षकांनी तयार केले होते.

होते. ओनमचे सांस्कृतिक महत्व हे रााधिका सोनावणे यांनी तर ओनमसाठी तयार केले जाणारे विविध खाद्यपदार्थ व तसेच त्यांचे महत्व हे प्राची जगवानी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर दक्षिणात्य वेशभूषे स्पर्धा घेण्यात आली. त्यात शुभांगी जाधव यांनी प्रथम तर सुर्यकांत वाघमारे द्वितीय तर राधिका सोनावणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला़ यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनघा गगडाणी, प्रवीण गगडाणी व शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांची उपस्थिती होती.

Web Title: Environmentally friendly protection in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.