अंनिस करणार सहा राज्यांमध्ये प्रबोधन : राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:12 PM2017-04-18T12:12:14+5:302017-04-18T12:12:14+5:30
गेली 27 वर्षे अंधश्रद्धा निमरूलन समिती महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमरूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कृतीशील करून समाज विवेकी निर्माण करण्याचा प्रय} करीत आहे.
Next
जळगाव,दि.18- गेली 27 वर्षे अंधश्रद्धा निमरूलन समिती महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमरूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कृतीशील करून समाज विवेकी निर्माण करण्याचा प्रय} करीत आहे. असेच प्रबोधनाचे काम महाराष्ट्रा लगतच्या सहा राज्यांमध्येही करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. दिल्ली येथे तर कामही सुरू झाल्याची माहिती अंधश्रद्धा निमरूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.
‘अंनिस’च्या प्रेरणा मेळाव्यासाठी ते जळगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी समितीची वाटचाल, वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्याबाबत मिळालेले यश व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आदी मुद्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कटय़ारे, विनायक सावळे, विश्वजित चौधरी उपस्थित होते.
दाभोलकरांच्या हत्येने कुणीही घाबरले नाही
अविनाश पाटील म्हणाले, ‘अंनिस’चे अध्वयरू व महाराष्ट्रातील एक अग्रणी समाजसुधारक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली. मनात दु:ख अन् संताप होता. मात्र कुणीही घाबरले नाही, थांबले नाही. उलट कार्यकर्ते तडफेने कामाला लागले. नवीन कार्यकर्ते मिळाले. डॉ.दाभोलकरांच्या खुनाची दखल जगभरातील मीडियाने घेतली. दाभोलकरांचे कार्य जगाच्या कान्याकोप:यात पोहचले.
महाराष्ट्राबाहेरही विस्तार
प्रबोधन व मार्गदर्शनाचे काम महाराष्ट्रात सध्या 310 शाखांद्वारे सुरू आहे. महाराष्ट्राबाहेर 12 राज्यात संपर्क असून इतर राज्यांमध्येही समितीने काम सुरू करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्येही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राजकीय इच्छाशक्ती नसल्याने दाभोलक:यांच्या हत्येचा तपास लागेना
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबाबत अविनाश पाटील म्हणाले, डॉ.दाभोलकरांच्या हत्येनंतर शासन व तपास यंत्रणांनी दीड वर्षे अक्षरश: वाया घालवली. हत्येचा तपास पाच यंत्रणा करीत आहे. असे असतानाही आरोपी सापडत नाही, यावर अंधश्रद्धा निमरूलन समितीचा विश्वास नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हत्येचा तपास अद्याप लागलेला नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटलो तर ते फक्त गोड बोलतात. तपास सुरू आहे, असे सांगतात. आता आम्ही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. त्यासाठी त्यांची वेळ मागितलेली आहे.