महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:06 PM2019-04-10T12:06:24+5:302019-04-10T12:07:35+5:30
अहवाल दिला
जळगाव - सोमवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाबाबतचा अहवाल महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकच्या (मेरी) अधिकारी चारुलता चौधरी यांनी आपला अहवाल मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकेणे यांच्याकडे दिला. या भूकंपाचा केंद्र बिंदू महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी संध्याकाळी ७.३९ वाजता रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचा अहवाल मंगळवारी देण्यात आला. त्यानुसार ३.५ रीश्टर स्केल एवढी तीव्रता असलेल्या भूकंपाचे हे सौम्य धक्के होते, असे अहवालात म्हटले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
या भूकंपाचे केंद्र नाशिकपासून २४० कि.मी. अंतरावर मध्यप्रदेश व महाराष्ट्रच्या सीमेवर होते, असेही अहवालात नमूद केले आहे.