ग्रा.पं.चे ठराव नसतानाही एरंडोलला काही शाळांमध्ये घंटा खणखणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:08+5:302021-07-16T04:13:08+5:30
एरंडोल : तालुक्यात कोरोनामुक्त गावांच्या १५ शाळांमधील एकूण ९३२ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. विशेष हे की ग्रामपंचायतीचे ...
एरंडोल : तालुक्यात कोरोनामुक्त गावांच्या १५ शाळांमधील एकूण ९३२ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. विशेष हे की ग्रामपंचायतीचे ठराव नसताना काही शाळांमधील विद्यार्थी शाळेत आले. त्यांच्या पालकांची संमती असल्यामुळे त्या ठिकाणी शाळेचे कामकाज सुरू झाले.
तालुक्यात इयत्ता आठवी ते बारावीची विद्यार्थी संख्या ५४७२ इतकी आहे. १५ शाळांचे ग्रामपंचायतींचे ठराव मिळाले नाहीत तर १२ शाळांचे ठराव देण्यात आले आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी व्ही.एच. पाटील यांनी दिली.
एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागातील शाळांची संख्या २८ आहे. यापैकी सोनबर्डी आश्रमशाळा (निवासी शाळा) हा अपवाद वगळता एकूण २७ शाळा आहेत. या शाळांमधील ग्रामपंचायतीने ठराव दिलेल्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे ९३२ विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी हजर होते. या शाळांची शिक्षक संख्या २१९ असून, १९९ शिक्षक उपस्थित होते.
१५ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव न दिलेल्या शाळा पुढीलप्रमाणे आहेत- शहजादी उर्दू माध्यमिक विद्यालय कासोदा. प्रियदर्शनी विद्यालय जळू, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा. क. न. मंत्री विद्यालय कासोदा. हाजी एन.एम. सय्यद हायस्कूल कासोदा. संत हरिहर विद्यालय निपाणी, माध्यमिक विद्यालय तळई, माध्यमिक विद्यालय ताडे, साधना विद्यालय कासोदा. माध्यमिक विद्यालय जवखेडेसीम, माध्यमिक विद्यालय भालगाव,) संघवी इंटरनॅशनल स्कूल उत्राण, माध्यमिक विद्यालय भातखेडा, भारती विद्यामंदिर कासोदा. लिटल व्हॅली उच्च प्राथमिक इंग्लिश स्कूल कासोदा.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच आपला पाल्य शाळेत जाऊ लागल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बऱ्याच दिवसांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान होत नव्हते.