एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दोन वेळा होणार ओ.पी.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:43 PM2019-09-24T23:43:03+5:302019-09-24T23:43:11+5:30
एरंडोल : येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी व नागरिकांची मागणी विचारात घेऊन ३० सप्टेंबरपासून बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत ...
एरंडोल : येथे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी व नागरिकांची मागणी विचारात घेऊन ३० सप्टेंबरपासून बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक बन्सी यांनी दिली आहे.
ओ.पी.डी.ची सुधारित वेळ पुढीलप्रमाणे : सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत, शनिवारी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत. शासकीय सुट्यांच्या दिवशी ओपीडी बंद राहील, असे कळविण्यात आले आहे
दरम्यान, एरंडोल ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत दिवसातून एकच वेळ बाह्यरुग्ण सेवा देण्यात येत होती. सुधारित वेळेनुसार दिवसातून सकाळ व दुपार या दोन्ही वेळा ओपीडी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.