एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:41+5:302021-07-20T04:12:41+5:30

एरंडोल : इयत्ता दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. दरम्यान, कल्पना समाधान पाटील (रवंजे) या विद्यार्थिनीचे आकस्मिक ...

Erandol taluka's class X result is 99.94 percent | एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९४ टक्के

एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.९४ टक्के

Next

एरंडोल : इयत्ता दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. दरम्यान, कल्पना समाधान पाटील (रवंजे) या विद्यार्थिनीचे आकस्मिक निधन झाले. तिचे इयत्ता नववीचे गुण प्रविष्ट झाले होते. परंतु, इयत्ता दहावीच्या गुणांचे मूल्यमापन न झाल्यामुळे तालुक्‍याचा निकाल शंभर टक्केच्या आत लागला आहे.

बी. के. माध्यमिक विद्यालय आडगाव या शाळेचा निकाल ९२.२० टक्के लागला आहे. संस्थाध्यक्ष शालिग्राम पाटील व मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलानेकर व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. रा. ती. काबरे विद्यालय एरंडोल निकाल शंभर टक्के लागला आहे. एसएससी परीक्षेला या शाळेचे ३२६ विद्यार्थी प्रविष्ट होते ,ते सर्व उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक मुक्ताई संजय मराठे या विद्यार्थिनीने मिळवला असून, तिला ९६.४० टक्के गुण मिळाले. हेरंब सुनील महाजन या विद्यार्थ्याने शेकडा ९६.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाच्या श्रद्धा फकिरा चौधरी या विद्यार्थिनीला ९५.२० टक्के गुण मिळाले. या शाळेचे १११ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापिका रोहिणी मानधने व उपमुख्याध्यापिका एस. ए. पाटील, पर्यवेक्षक नरेश डागा व ए. आर. मालू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एरंडोल तालुक्यात १९७९ विद्यार्थी प्रविष्ट होते, ते सर्व उत्तीर्ण झाले. ४९४ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने पास झाले प्रथम श्रेणीत १०९५ विद्यार्थी यशस्वी झाले. द्वितीय श्रेणीत १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे या शाळेचा निकाल ९८ टक्के लागला तर महात्मा फुले हायस्कूल एरंडोलचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. संस्था अध्यक्ष विजय महाजन व चेअरमन अरुण कुमार माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. ग्रामीण उन्नती विद्यालयाचा सुद्धा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्था अध्यक्ष सचिन विसपुते व मुख्याध्यापिका अनुषा चव्हाण यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तळई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तथा स्थानिक पत्रकार सुनील पाटील यांचा चिरंजीव संदेश सुनील पाटील ९७.४० टक्के गुण मिळवून यशस्वी झाला आहे. तो तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे असा दावा केला जात आहे.

Web Title: Erandol taluka's class X result is 99.94 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.