एरंडोल येथे युवकांनी स्वतः केली नालेसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 02:59 PM2021-01-17T14:59:53+5:302021-01-17T15:01:16+5:30

एरंडोल : येथील न्यू लक्ष्मी नगरातील युवकांनी मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला. मकरसंक्रांतीनिमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ...

At Erandol, the youth did the cleaning themselves | एरंडोल येथे युवकांनी स्वतः केली नालेसफाई

एरंडोल येथे युवकांनी स्वतः केली नालेसफाई

Next


एरंडोल : येथील न्यू लक्ष्मी नगरातील युवकांनी मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला.
मकरसंक्रांतीनिमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ते स्वतः राहत असलेल्या न्यू लक्ष्मी नगर या ठिकाणी नवीन वसाहत असल्याने त्याठिकाणी अजून गटारी नसल्याने गटारीचे पाणी हे इतरत्र अस्ताव्यस्त पसरते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्या परिसरात राहणारे युवक कृष्णा ओतारी व मित्र परिवाराने स्वखर्चाने जेसीबीच्या साह्याने या गटारी स्वच्छ केल्या व स्वच्छता अभियान राबवले. यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा कमी झाला आहे. आजच्या युगात युवकांनी केलेल्या केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल न्यू लक्ष्मी नगरातील रहिवाशांनी व शहरातील रहिवाशांनी कौतुक केले.
या उपक्रमात तेजस पिंगळे, सागर सोनवणे, ज्ञानेश्वर सपकाळे, गौरव महाले, प्रमोद राजपूत, जगदीश चौधरी, रणवीर राजपूत, प्रशांत माळी, साहिल गांगुर्डे, राहुल राजपूत, पंकज मराठे, हेमंत सोनार, सचिन सोनवणे, दत्तराज वाघ, सनी राजपूत, महेंद्र मराठे, विशाल मिस्त्री, राहुल पाटील, सागर शिंदे आदी युवकांनी सहभाग नोंदविला.

Web Title: At Erandol, the youth did the cleaning themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.