एरंडोलच्या माहेरवाशीणचा पाच लाखांसाठी छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:35 PM2018-12-28T16:35:47+5:302018-12-28T16:37:38+5:30
चैनीच्या वस्तू व दागिने विकत घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशीण जयश्री प्रतीक पाटील हिचा सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
एरंडोल : चैनीच्या वस्तू व दागिने विकत घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशीण जयश्री प्रतीक पाटील हिचा सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री व प्रतीक यांचा विवाह १३ जुलै रोजी थाटात पार पडला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर ‘तू काळी आहे. मला मुंबईकडे १ लाख रुपये कमविणारी पत्नी पाहिजे होती असे म्हणून तिचा इंजिनियर पती प्रतीकसह सासरच्या इतर लोकांनी छळ सुरू केला. तसेच माहेरून ५ लाख रुपये आणावेत यासाठी त्यांनी तगादा लावला. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे जयश्रीचा शारीरिक व मानसिक छळ वाढला. या दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावरील १३० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले. या साऱ्यात छळ असह्य झाल्याने महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित आरोपी पती प्रतीक जयवंत पाटील, रा नावापाडा ठाणे, मनाली जयवंतराव पाटील (सासू), जयवंतराव बारीकराव पाटील (सासरा), स्मिता किरण पाटील (नणंद), किरण यशवंत पाटील (नंदोई) दोघे रा. डोबीवली यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४९८,५०४, ५०६, ३४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तपास हवालदार नारायण पाटील, प्रमोद कोळी करीत आहेत.