एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:09 PM2019-10-23T12:09:26+5:302019-10-23T12:10:24+5:30

दुपारी २ पर्यंत येणार पहिला निकाल : जळगाव शहरासाठी सर्वाधिक २९ फेऱ्या; निकालाला ४ वाजणार

 Erandol's outcome will be the first | एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी

एरंडोलचा निकाल येणार सर्वात आधी

Next

जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी संबंधीत तालुक्याच्या ठिकाणी होणार असून त्यासाठीची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एरंडोल मतदार संघात सर्वात कमी उमेदवार व कमी फेºया असल्याने तेथील निकाल सर्वात आधी दुपारी २ वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर जळगाव शहर मतदार संघासाठी २९ फेºया असल्याने अधिकृत निकाल येण्यास ४ वाजण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात सरासरी ६०.९० टक्के इतके मतदान झाले असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता १२५४ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
सकाळी ८ वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरीता १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे.
मतमोजणीसाठी आज प्रशिक्षण
मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण २३ आॅक्टोबर रोजी होणार आहे. प्रशिक्षणानंतर मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करुन कोणाला कोणत्या मतदार संघात मतमोजणीसाठी पाठवायाचे याचे आदेश संबंधितांना देवून त्यांना लगेचच मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदानकेंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

मतमोजणी होणार असलेली ठिकाणे
चोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, चोपडा, रावेर - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर, भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ, जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक २६, जळगाव, जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, धरणगाव, अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर, एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल, चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव, पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक ३, मोंढाळा रोड, पाचोरा, जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक ३, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर, मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर येथे होईल.

Web Title:  Erandol's outcome will be the first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.