विमानसेवेमुळे जळगाव घेणार विकासाच्या दिशेने ङोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:36 AM2017-12-23T11:36:40+5:302017-12-23T11:40:36+5:30

उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांचा विश्वास

Eroplane service, Jalgaon will move towards development | विमानसेवेमुळे जळगाव घेणार विकासाच्या दिशेने ङोप

विमानसेवेमुळे जळगाव घेणार विकासाच्या दिशेने ङोप

Next
ठळक मुद्देतीन महिन्यात 100 आसनी विमान सुरू होण्याची आशा‘ग्रीन कॉरिडॉर’तयार होऊ शकतो

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23- जळगावातून आजपासून सुरू होणा:या विमानसेवेमुळे येथील नैसर्गिक विकास होण्यास आता ख:या अर्थाने सुरुवात होणार असून औद्योगिक, व्यापार, हॉटेल उद्योग यासह सर्वच क्षेत्रात शहर विकासाच्या दिशेने ङोप घेईल, असा विश्वास उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’तर्फे शुक्रवारी आयोजित चर्चासत्रात  व्यक्त केला. 
23 डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर या सेवेमुळे उद्योग, व्यापार, हॉटेल व्यवसायाची स्थिती कशी असेल, अपेक्षा काय आहेत? याबाबत शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी ‘लोकमत’कार्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 
या वेळी ‘जिंदा’ संघटनेचे संस्थापक रजनीकांत कोठारी, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, एम. सेक्टर उद्योजक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अरुण बोरोले, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे संचालक पुरुषोत्तम टावरी, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसुफ मकरा, सचिव ललित बरडिया, जळगाव हॉटेल अॅण्ड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव संजय जगताप, जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील, जि.प. सदस्य लालचंद पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

सर्वाच्या सोयीचे वेळापत्रक असावे
जळगावात विमानसेवेची मागणी वर्षानुवर्षापासूनची आहे. यापूर्वीही सर्व उद्योजकांनी विमानसेवेस प्रतिसाद देण्यासाठी हमी दिली होती, मात्र तरीही विमानसेवा सुरू झाली नाही. अखेर आता विमानसेवेचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत  आहे. यामध्ये सध्याचे जे वेळापत्रक दिले आहे त्यामध्ये जळगावहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी 9 वाजता विमानाचे उड्डाण असावे. कारण सकाळी जळगावातून उद्योजक, व्यापारी व इतर मंडळींना मुंबईला जायचे झाल्यास ते सकाळी निघून दिवसभरात तेथील काम आटोपून संध्याकाळी पुन्हा जळगावला परतू शकतील. यासाठी सर्वाचा विचार करून हे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. कारण दुपारी येथून गेले तर काम झाल्यानंतर मुंबईत निवासाचा खर्च वाढून तो न परवडणारा आहे.  असे झाल्यास जळगावातून 100 आसनी विमानही कमी पडेल, एवढा प्रतिसाद त्याला जळगावातून मिळेल. या सोबतच जळगावातील विमानतळाकडे जाणा:या रस्त्यांची दैना दूर करून बाहेरील येणा:या उद्योजक, पर्यटकांना सोयीचे वातावरण तयार करण्यात यावे. 
- रजनीकांत कोठारी. 

अखंडीत सेवेसाठी सर्वाचा पुढाकार महत्त्वाचा
विमानसेवा अखंडीतपणे कशी सुरू राहील यासाठी सर्वाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. येथील सर्वजण या सेवेसाठी सकारात्मक असून या सेवेमुळे विकासास चालना मिळणार आहे. विमानाचे सर्व बुकिंग आतापासूनच फुल्ल झाले असल्याने विमानसेवेचा प्रतिसाद यावरून लक्षात येतो. यातून अनेक जण कामानिमित्त प्रवास तर करतीलच आम्ही उद्योजक म्हणून तसेच रोटरीमार्फत 19 आसन पूर्ण आरक्षित करून अनेकांना हवाई सफर घडवून आणू. या सेवेस जळगावातून प्रतिसाद पाहता कंपन्यांना येत्या तीन महिन्यात मोठे विमान उपलब्ध करून द्यावे लागले. उद्योगांचा विचार केला तर आता बाहेरील उद्योजक येथे येऊन वेळ देऊ शकतील व औद्योगिक विकास होण्यास मदत होईल. 
- प्रेम कोगटा. 


.. तर स्लॉट वाढवून मिळू शकतात
जळगावातून विमानसेवेस मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. यासाठी विमानांच्या फे:या वाढवाव्या लागतील. मात्र मुंबई विमानतळाची व्यस्तता पाहता तेथे स्लॉट मिळणे कठीण आहे. यासाठी मुंबईतीलच जुहू विमानतळ सुरू करण्यात यावे, जेणे करून आपल्याला विमानांचे अधिक स्लॉट मिळू शकतील. येथील सर्वाच्या सोयीसाठी वेळापत्रकात बदल करण्याचा विचार होणेही गरजेचे आहे. 
- पुरुषोत्तम टावरी. 

विमानतळ परिसराचा विकास व्हावा
विमानसेवेमुळे येथील उद्योग, व्यापारास चालना मिळणार आहे. या सोबतच विमानतळ परिसराचाही विकास करणे गरजेचे आहे. कारण या परिसरात हॉटेल्स व इतर सोयी-सुविधा झाल्यास येणा:या उद्योजक, व्यापारी, पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. सर्वासाठी प्रवास भाडेही परवडणारे असल्याने व्यापारी, उद्योजक विमान प्रवासास प्राधान्य देतील. 
- युसुफ मकरा. 


जळगावात पोषक वातावरण
मुंबई येथून इतर शहरात विमानाने जाण्यासाठी उद्योजकांना रेल्वेने जावे लागते. मात्र आता विमानाने गेल्यास थेट विमानतळावर पोहचून तेथून दुस:या विमानाने प्रवास करणे सोयीचे ठरून वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. वैद्यकीय विचार केला तर वेळेवर उपचार मिळणे शक्य होणार आहे. आता सोयी-सुविधांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे त्या दर्जाचा  वर्ग जळगावात असल्याने ते विमानसेवेस प्राधान्य देतील. जळगावात उद्योग, व्यापार वाढीस पोषक वातावरण असल्याने विमानसेवेमुळे विकासात भर पडेल. 
- ललित बरडिया

हॉटेल असोसिएशनतर्फे पॅकेज
विमानसेवेमुळे मोठमोठे उद्योजक, पर्यटक येथे आल्याने हॉटेल व्यवसायास चालना मिळून हा उद्योग आणखी वाढेल. जळगावात आजही ‘स्टार रेटिंग’ची सेवा जळगावातील हॉटेल्स देतात. मात्र जाचक अटींमुळे हे प्रमाणपत्र घेतले जात नाही. मात्र आता तारांकीत हॉटेलकडे कल वाढणार असून असोसिएशनच्यावतीने विविध पॅकेज उपलब्ध करू दिले जातील.  विमानाने औरंगाबादला येणारे पर्यटक जळगावात येण्याची अपेक्षा असल्याने त्या दर्जाची पूर्तता जळगावातच पूर्ण केली जाईल. 
- संजय जगताप. 

रोजगार निर्मिती व विकासाकडे वाटचाल
जळगावातून विमानांची वेळ सोयीची ठेवल्यास उद्योजक विमानसेवेलाच प्राधान्य देतील. उद्योग, व्यापार वाढीस जळगावात पोषक वातावरण असले तरी विमानसेवेअभावी औद्योगिक विकास खुंटला. त्या तुलनेत औरंगाबाद, नाशिक विकसित झाले व आपण मागे पडलो. मात्र आता उद्योग वाढीमुळे रोजगार निर्मिती होण्यासह आर्थिक उलाढालही वाढेल व जळगाव विकासाकडे वाटचाल करणार आहे. 
- अरुण बोरोले. 

विमानतळ प्राधीकरणाचे शेतक:यांकडे दुर्लक्ष
विमानसेवा सुरू होत आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र यामध्ये विमानतळ प्राधीकरणाचे शेतक:यांकडे होत असलेले दुर्लक्ष योग्य नाही. शेतक:यांची जमीन संपादन करताच प्राधीकरणाने शेतक:यांच्या जमिनीला संरक्षण भिंत उभारली आहे. यामुळे 400 ते 500 शेतकरी बाधीत झाले असून ते शेतीही करू शकत नाही की त्यांना मोबदलाही मिळालेला नाही. या सोबतच प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 18 वरील विमानतळानजीकचा वळण रस्ताही चुकीचा असून यामुळे भविष्यात मोठय़ा विमानांच्या दृष्टीने अडचणी येऊ शकतात.
-लालचंद पाटील

हॉटेलची संख्या वाढेल
विमानसेवेसाठी शहरात दज्रेदार हॉटेल्स आवश्यक असतात. तशा हॉटेल्स आजही शहरात आहे. मात्र आता त्यात अधिक सुधारणा होणार असून दज्रेदार सेवा पुरविली जाईल. इतकेच नव्हे विमानतळ परिसरातही नवीन हॉटेल्स येतील. यातून शहराचाही विकास होणार आहे. 
- ललित पाटील. 


सिगAल सुरु करण्यासाठी दालमिल असो.25 टक्के खर्च करण्यास तयार
विमानसेवा सुरू होत असल्याने यासाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लागणेही गरजेचे आहे. अजिंठा चौफुली ते विमानतळार्पयतच्या सर्व चौफुलीवरील सर्व सिग्नल सुरू होणे गरजेचे आहे. दालमिल असोसिएशन यासाठी 25 टक्के खर्च करण्यास तयार प्रेम कोगटा यांनी यावेळी सांगितले. या मार्गावरील रस्त्याच्या समस्येने अनेक अडचणी येतात, त्या दूर करण्यात याव्या, असे त्यांनी नमूद केले. 

‘लोकमत’ची भूमिका कौतुकास्पद
विमानसेवा सुरू होणार असल्याने यामुळे होणारे फायदे तसेच अपेक्षा या बाबत ‘लोकमत’ने  सुरुवातीपासूनच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांची मते जाणून घेतली, हे कौतुकास्पद असल्याचा सूर या वेळी उमटला. प्रत्यक्षात यासाठी लोकप्रतिनिधींनी सर्वांना विश्वासात घेऊन विचारणा करणे गरजेचे होते, अशीही अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. 

अधिक स्लॉट मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
मुंबईतील विमानतळ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे, मात्र सध्या केवळ ते खाजगी कंपनीस चालविण्यासाठी दिले आहे. असे असले तरी ते महाराष्ट्रात असल्याने तेथे जळगाव तसेच राज्यातील इतर शहरांच्या विमानांना अधिक स्लॉट मिळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील खासदारांनी पुढाकार घ्यावा, असा सूरही या वेळी उमटला. 

‘ग्रीन कॉरिडॉर’तयार होऊ शकतो
विमानसेवेमुळे अवयव प्रत्यारोपण शक्य होणार असल्याने जळगावातून ‘ग्रीन कॉरिडॉर’तयार होण्याचे आश्वासक चित्र असून यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते, असाही सूर या वेळी उमटला. 

नामवंत कलावंतांची सोय होणार
जळगावात विमानसेवा नसल्याने अनेक नामवंत कलावंत जळगावात येण्यास नकार देत होते. मात्र आता विमानसेवेमुळे अनेक कलावंतांसाठी ते सोयीचे होणार असल्याने ते जळगावात आल्याने सांस्कृतिक क्षेत्रासही चालना मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

परिसर विकासाची प्रकरणे प्रलंबित
विमानतळ परिसरात बांधकाम करून परिसर विकासासाठी युसुफ मकरा यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई व दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडे प्रकरण सादर केले आहे. मात्र त्यास मंजुरी न मिळाल्याने ते प्रलंबित आहे. ती मार्गी लावण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

इतर शहरासांठीही विमानसेवा सुरू व्हावी
जळगावातून आता मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली असली तरी या सोबतच पुणे, नागपूर, अहमदाबाद, इंदूर, कलकत्ता या शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्यात यावी, असा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. जळगावातील व्यापारी, उद्योजकांना नेहमी या शहरासह कोलकता येथे जावे लागते तसेच पुणे येथे जाणा:यांचीही संख्या मोठी असल्याने या शहरांसाठी सेवा सुरू केल्यास तिलाही मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

Web Title: Eroplane service, Jalgaon will move towards development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.