जळगाव जिल्ह्यातील दोन आश्रमशाळांमध्य आढळल्या त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 11:16 AM2017-04-22T11:16:34+5:302017-04-22T11:16:34+5:30
जिल्ह्यातील 50 शासकीय व अनुदानित आश्रम शाळांची तपासणी करण्यात आली.
प्रकल्प अधिका:यांचा दावा : 50 आश्रमशाळांची तपासणी पूर्ण
जळगाव : जिल्हाधिका:यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 50 शासकीय व अनुदानित आश्रम शाळांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दोन आश्रमशाळांमध्ये त्रुटी आढळून आल्याचा दावा प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी केला आहे.
आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना शासनाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. यासाठी लाखोचे अनुदानदेखील दिले जाते. मात्र प्रत्यक्षस्थितीत विद्याथ्र्यार्पयत या सुविधा पोहचत नसल्याची स्थिती अनेक आश्रमशाळांमध्ये निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील 32 अनुदानित व 18 शासकीय आश्रमशाळांची 5 ते 10 एप्रिल दरम्यान तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 50 शाळांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर या शाळांचा अहवाल जिल्हाधिका:यांना सोपविण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर
आश्रमशाळांमध्ये काही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असल्याची माहिती आर.बी.हिवाळे यांनी दिली. तर खासगी अनुदानित शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही, यासाठी संस्थाचालकांना सूचना दिल्या आहेत. तपासणी दरम्यान प्रत्येक आश्रमशाळेत तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. 18 शासकीय आश्रमशाळांमध्ये हेल्पलाईन क्रमांक सुध्दा देण्यात आल्याची माहिती आर.बी.हिवाळे यांनी दिली.
सात पथकांनी केली तपासणी
आश्रमशाळांच्या तपासणीसाठी सात पथकांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिका:यांचा समावेश पथकात होता. तपासणी करण्यात आलेल्या 50 शाळांपैकी एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा येथील खासगी अनुदानित आश्रमशाळेजवळ बियरबार असल्याचे आढळून आले आहे. तर एरंडोल तालुक्यातीलच सोनबर्डी शासकीय आश्रमशाळेत खरेदीबाबत कोणतीही नोंद नसल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.