अमळनेरला आज निबंध स्पर्धा बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:26+5:302021-09-02T04:34:26+5:30

राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत लॉकडाऊन काळात मुलांना उत्तेजन मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

Essay competition prize distribution to Amalner today | अमळनेरला आज निबंध स्पर्धा बक्षीस वितरण

अमळनेरला आज निबंध स्पर्धा बक्षीस वितरण

Next

राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत लॉकडाऊन काळात मुलांना उत्तेजन मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महिला सक्षमीकरणात पुरुषी मानसिकतेची भूमिका हे दोन निबंध स्पर्धेचे विषय होते. निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी एच. टी. माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डिगंबर महाले, प्रा. डॉ. वंदना पाटील, भारती पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रांताधिकारी सीमा अहिरे, जि. प. सदस्या जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, संदीप घोरपडे, श्रीमान घोडके, भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध सिसोदे यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार आयोजित केला आहे.

निबंध स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व ५ उत्तेजनार्थ बक्षिसे असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

उपस्थितीचे आवाहन प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, गौतम मोरे, डी. एम. पाटील, वाल्मीक मराठे, विठ्ठल पाटील, एस. एन. पाटील, छाया सोनवणे, अशोक इसे, डॉ. राहुल निकम, रणजित शिंदे, संदीप जैन, यतीन पवार यांनी केले आहे. हा कार्यक्रम १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता, लायन्स-आयएमए हॉल, जी. एस. हायस्कूल येथे होईल.

Web Title: Essay competition prize distribution to Amalner today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.