अमळनेरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 09:57 PM2019-08-02T21:57:47+5:302019-08-02T22:00:55+5:30

प्रताप महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात येऊन प्रथम वर्षाच्या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र द्यावे. यासह इतर भेडसावणाºर्या शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपतर्फे चेअरमन प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉ.ज्योती राणे यांना देण्यात आले.

Establish damini squad for security of students in Amalner | अमळनेरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमा

अमळनेरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमा

Next
ठळक मुद्देप्रताप महाविद्यालय शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपचे व्यवस्थापनाला साकडे

अमळनेर, जि.जळगाव : प्रताप महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात येऊन प्रथम वर्षाच्या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र द्यावे. यासह इतर भेडसावणाºर्या शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपतर्फे चेअरमन प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉ.ज्योती राणे यांना देण्यात आले.
यावेळी अभाविप प्रांत कार्यकारणी सदस्या स्वाती पाटील, शहर सहमंत्री अभिषेक पाटील, कृष्णा साळुंखे, नीलेश पवार, शैलेश पायही, प्रियंका पाटील, योगिता पाटील, रोहित पवार, मंदार पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्यांमध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींंसाठी एसएमएस सुविधा मिळत नाही, वर्गातील बाके स्वच्छ राहत नाहीत, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, विद्यार्थिनींंसाठी अभ्यासिका वर्ग वाढवा, आर. के. बंगाली लायब्ररीमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्वछतागृह असावे, खेड्यावरील विद्यार्थ्यांना स्वतंत्र जेवणासाठी जागा उपलब्ध करणे, ई सुविधा केंद्र असूनही बंद असते ते सुरू करावे. विद्यार्थ्यांना लायब्ररी फी परत करणे, शौचालयात भांडी बसवणे, विद्यार्थ्यांकडून मेडिकल फी घेतली जाते पण ती सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाही, वर्गात असलेली बाके, वर्गात स्वच्छता राहत नाही. प्रत्येक विभागात तक्रार पेटी असावी या समस्या सोडवण्यासाठी आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे
 

Web Title: Establish damini squad for security of students in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.