उपजिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 09:16 PM2020-03-08T21:16:16+5:302020-03-08T21:19:03+5:30
मुक्ताईनगर : आमदारांनी केली पाहणी ; सोमवारी तहसील कार्यालयात आढावा बैठक
मुक्ताईनगर : कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून आपत्कालीन स्थितीत उपायोजना करता यावी म्हणून मुक्ताईनगर जिल्हा उपरुग्णालयामध्ये कोरोना कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षाची पाहणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.
जवळच असलेल्या अकोला येथे कोरोना बाधित संशयित रुग्ण आढळल्याने मुक्ताईनगर रुग्णालयात तत्काळ कोरोना कक्षाची स्थापना स्थापना करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार अधिवेशनाहून होऊन परत आल्यानंतर त्यांनी या कक्षाची पाहणी केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील दासोरे उपस्थित होते तर प्रवीण चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, संतोष कोळी, शुभम शर्मा, प्रदीप काळे, प्रफुल्ल पाटील, दीपक पवार, महेंद्र मोंढाळे व इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दरम्यान, याबाबत सोमवारी तहसील कार्यालयात आमदारांनी संबंधित आधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली आहे.