यावल तालुक्यातील न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 03:15 PM2019-09-15T15:15:40+5:302019-09-15T15:16:48+5:30
मूकबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग सेनेची स्थापना करण्यात आली.
न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : येथे मूकबधिर, अंध, मतिमंद, शारीरिक अपंग यांच्या न्याय हक्कासाठी दिव्यांग सेनेची स्थापना करण्यात आली.
येथील खंडेराव देवस्थान सभागृहात १४ रोजी दिव्यांग सेनेच्या फलकाचे अनावरण दिव्यांग जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच भारती चौधरी अध्यक्षस्थानी होत्या.
दिव्यांगांनी प्रथम आॅनलाइन फॉर्म भरून घ्यावे. तसेच जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वांना जळगाव येथे जावे लागते. यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेतले तर दिव्यांगाची पायपीट थांबेल व खर्चही वाचेल. यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेण्याविषयी संबंधितांना विनंती केली जाणार असल्याचे अक्षय महाजन यांनी सांगितले.
दिव्यांग यांनी एकत्र येवून आपले प्रश्न सोडवावे, असे सरपंच भारती चौधरी व ग्रामपंचायत सदस्य अलिशान तडवी यांनी सांगितले.
न्हावी अध्यक्ष अशोक कोळी, उपाध्यक्ष अशोक गाजरे, सचिव भिकन वसाने, कार्याध्यक्ष धीरज मोतीवाले, सल्लागार पंडित पाटील, सहकारी अध्यक्ष योगेश पाटील, संघटक प्रमुख चंद्र पाटील, उपसंघटक प्रमुख फिरोज तडवी, उपसचिव शेख रसूल पिंजारी, संपर्कप्रमुख मोहन पाटील यांची नियुक्ती जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात आली.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष यशवंत तळेले, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र मिस्त्री, यावल तालुकाध्यक्ष नानाभाऊ मोची, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, सावदा शहराध्यक्ष विशाल कासार, उपाध्यक्ष तेजस वंजारी, सावदा ग्रामीण दिलीप जैन, रावेर शहराध्यक्ष रजनीकांत बारी, जिल्हा सचिव शकील व न्हावी, बोरखेडा परिसरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन खुशाल महाजन यांनी केले.