जळगाव जिल्ह्यातील २१५७ मंडळांकडून दुर्गा स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:39 PM2019-09-29T12:39:03+5:302019-09-29T12:39:29+5:30
मनुदेवी यात्रेसाठी ४० जादा बसेस
जळगाव : जिल्ह्यात यंदा २ हजार १५७ मंडळाकडून दुर्गात्सवाची स्थापना होणार असून १ हजार ६६७ ठिकाणी सार्वजनिक तर ४९० ठिकाणी खासगी मंडळातर्फे उत्सव साजरा केला जाणार आहे,. स्थापना ते विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘लोकमत’ ला दिली. रविवारपासून सुरु होणाऱ्या दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी शनिवारी जिल्ह्याचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.हा उत्सव शांततेत पार पडावा, या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी बाहेरुन पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. अफवा पसरविणाºयांवर तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
मनुदेवी यात्रेसाठी ४० जादा बसेस
आज पासून सुरु होणाºया नवरात्रोत्सवानिमित्त एस. टी. महामंडळातर्फे मनुदेवी यात्रेसाठी विविध आगारातून दररोज ४० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच सप्तशृंग गडासाठी विशिष्ट प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावर थेट गडावर जाण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवासाठी जळगाव, रावेर, भुसावळ, एरंडोल, यावल, जामनेर, धरणगाव, पारोळा या आगारातून दररोज दैनंदिन फेºयासह जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
यासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. अष्टमी व नवमीला जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे विभाग नियंत्रक राजेंंद्र देवरे यांनी सांगितले.