यावल येथील श्री स्वामिनारायण मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंंत्रोच्चारात देवतांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:43 AM2018-12-15T01:43:22+5:302018-12-15T01:44:33+5:30

यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवतांची प्राणप्रतिष्ठा वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडल्यांनतर शुक्रवारी ५६ नैवेद्य दाखवून राजभोग आरतीनंतर भाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले करण्यात आले आहे.

Establishment of Gods in the temple of Lord Swaminarayan in Yaval | यावल येथील श्री स्वामिनारायण मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंंत्रोच्चारात देवतांची स्थापना

यावल येथील श्री स्वामिनारायण मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंंत्रोच्चारात देवतांची स्थापना

Next
ठळक मुद्दे५६ नैवेद्य दाखवून राजभोगभाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले१८ डिसेंबरपर्यत सुरू राहणार कार्यक्रम

यावल, जि.जळगाव : यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवतांची प्राणप्रतिष्ठा वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडल्यांनतर शुक्रवारी ५६ नैवेद्य दाखवून राजभोग आरतीनंतर भाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमीत्ताने विविध कार्यक्रम सुरू असून, गुजरातसह राज्यातून हजारो भाविक व स्वामिनारायण पंथीय शास्त्री या कार्यक्रमास उपस्थित आहेत.
गुरुवारी दुपारी वडताल संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्ताने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी त्यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात यज्ञपूजा, व प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. शुक्रवारी देवतांना ५६ भोग नैवद्य चढवण्यात आला. त्यांनतर राजभोग आरती होऊन मंदिर दर्शनार्थ खुले करण्यात आले आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळयास १२ डिसेंबरपासून सुरवात झाली आहे. हा कार्यक्रम ते १८ डिसेंबरपर्यत सुरू राहणार आहे. मंंदिर आवारात संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताह सुरू असून, यास शहरासह परीसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थिती देत आहेत.
कार्यक्रमास स्वामिनारायण पंथाचे सर्वोच्च श्रध्दास्थान असलेल्या गुजरातमधील वडताल संस्थानचे गादिपती प.पू.ध.धू. १००८ आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांनी भेट दिली आहे. मंदिरात श्री स्वामिनारायण, श्री लक्ष्मीनारायण, श्री गणेश, हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजक श्री वासुदेव चरणदास महाराज आहेत. कार्यक्रमास के.के.शास्त्री, कृष्णजीवनदासजी महाराज यांच्यासह पंथाचे अनेक शास्त्रीजी उपस्थित आहेत. महोत्सवाचे मुख्य यजमान येथील प्रगतीशिल शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे, सहयजमान माणिक भिरूड, कथा यजमान घनश्याम जंगले, सहयजमान नितीन महाजन यासह विविध कार्यक्रमांच्या यजमानामध्ये सलील महाजन, निर्मल चोपडे, घाटकोपर महिला मंडळ, भूमिदान योगेश्श्वरदासजी महाराज, श्यामसुददास महाराज, वासदेवचरणदास माराज, प्रमोद नेमाडे, प्रमोद कोळंबे यांचा समावेश आहे. कार्यक्रमास शहरासह परिसरातील शेकडो स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Web Title: Establishment of Gods in the temple of Lord Swaminarayan in Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.