राष्ट्रीय पातळीवर ‘सेव्ह सलून इंडिया’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:35+5:302021-08-12T04:20:35+5:30

११ ऑगस्ट २०२० या दिवशी लाॅकडाऊन काळातील सलून व्यवसायाची व्यथा आणि व्यावसायिकांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचविणे कामी सेव्ह सलून ...

Establishment of ‘Save Salon India’ at the national level | राष्ट्रीय पातळीवर ‘सेव्ह सलून इंडिया’ची स्थापना

राष्ट्रीय पातळीवर ‘सेव्ह सलून इंडिया’ची स्थापना

googlenewsNext

११ ऑगस्ट २०२० या दिवशी लाॅकडाऊन काळातील सलून व्यवसायाची व्यथा आणि व्यावसायिकांचा आवाज सरकारी दरबारी पोहोचविणे कामी सेव्ह सलून इंडियाच्या माध्यमातून थेट राष्ट्रीय पातळीवर सामाजिक ऐक्यसारख्या महत्त्वाच्या विषयावर विचारांची देवाण-घेवाण होत आहे. यासाठी पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून ट्विटरद्वारे लाखाच्यावर ट्विट्स करण्यात आले. दीड लाखाच्या आसपास ई मेल पाठविण्यात आले. भविष्यातदेखील सलून व्यावसायिकांच्या उदरभरणावर व्यथा सेव्ह सलून इंडियामार्फत शासन स्तरावर पाठविण्याचा निर्णय नुकताच झाला.

११ ऑगस्ट २०२० ऐतिहासिक दिवसाची ओळख नाभिक समाजाप्रमाणे इतरही १२ बलुतेदारांना व्हावी. सामाजिक ऐक्य व सलोख्यातून सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाची एक वेगळी ओळख कायम राहावी म्हणून यंदापासून दरवर्षी ११ ऑगस्ट हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय सलून दिवस’ या नावाने साजरा होणार असल्याचे राजस्थानी नारायणी सेना व ख्यातनाम केशरचनाकार उदय टक्के, संजय पंडित, नाभिक सेन संगठन, राष्ट्रीय सलून मंचने जाहीर केले आहे.

Web Title: Establishment of ‘Save Salon India’ at the national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.