न्हावी शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 07:32 PM2019-11-08T19:32:24+5:302019-11-08T19:33:19+5:30
न्हावी, ता.यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : न्हावी, ता.यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. अध्यक्षपदी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शरद महाजन तसेच विद्यमान उपाध्यक्ष अनिल लढे यांचीही बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची एकूण संख्या १७ आहे. या या निवडीची अधिकृत घोषणा ही १७ रोजी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
न्हावी येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक १७ नोव्हेंबर रोजी होणार होती. त्यासाठी शुक्रवार माघारीचा दिवस होता. १७ जागांसाठी ३३ उमेदवारांचे अर्ज दाखल होते. मात्र निवडणूक रिंगणातून १६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार- अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, पेट्रन संचालक प्रा.डॉ.के.जी पाटील, किशोर तळेले, संचालक अविनाश फिरके, एल.के.चौधरी, पी.एच.महाजन, भानुदास चोपडे, वामन नेहते, जयंत बेंडाळे, हर्षद महाजन, दिगंबर कोलते, सागर चौधरी, रवींद्र कोलते, सुरेश चौधरी, संदेश महाजन, राजेश तळेले अशी आहे.
या निवडीची अधिकृत घोषणा ही १७ रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा फिरके यांनी काम पाहिले.