लोकेशच्या इच्छाशक्तीपुढे संकटेही झाली पराभूत; थॅलेसिमियाग्रस्त मुलाची प्रेरणादायी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:35 IST2025-02-07T14:32:39+5:302025-02-07T14:35:36+5:30
लोकेशच्या तब्येतीच्या काळजीमुळे त्याला घरच्यांनी बाहेरगावी शिकायला पाठवले नाही.

लोकेशच्या इच्छाशक्तीपुढे संकटेही झाली पराभूत; थॅलेसिमियाग्रस्त मुलाची प्रेरणादायी कहाणी
अमळनेर : तालुक्यातील लोंढवे येथील थॅलेसिमियाग्रस्त शाळकरी विद्यार्थी लोकेश दीपक पाटीलचा एकूणच जीवन हा जितका प्रवास भावविभोर आहे तितकाच प्रेरणादायी आहे. लोकेशची बुद्धिमत्ता आणि जिद्दीपुढे सर्व संकटांनी जणू शरणागती पत्करली आहे. यात थॅलेसिमियासारख्या आजाराचाही समावेश आहे. जीवघेण्या लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील लोकेश नवोदयच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. भुसावळ येथील नवोदय विद्यालयात सहावीपासून पुढील शिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. लोकेशच्या तब्येतीच्या काळजीमुळे त्याला घरच्यांनी बाहेरगावी शिकायला पाठवले नाही.
थॅलेसिमिया म्हणजे काय?
हा आजार जन्मापासूनच असतो. मूल जन्मल्याच्या तीन महिन्यांनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. या आजारात बाळाच्या शरीरात रक्ताची कमी होऊ लागते. त्यामुळे त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. परिणामी शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होते. जीवनातील खडतरता आणि शारीरिक वेदनांविषयी त्याची कोणतीही तक्रार नाही. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही कष्टप्रद भाव नसतात. त्याचे वडील मोलमजुरी करून कसेतरी घरचा गाडा हाकत आहेत.
मदतीचा हात सरसावला
लोकेश याच्या शाळेत आमदार अनिल पाटील स्नेहसंमेलनानिमित्त आले होते. तिथे त्यांना लोकेशबद्दल माहिती मिळताच त्याच्या पुढील सर्व शिक्षणाची सर्व आर्थिक जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.