घरात शिरूनही कोरोनाला वयोवृद्धांनी ठेवले चार हात लांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:34+5:302021-06-10T04:12:34+5:30
दवाखाना मक्तण अखंडित दिनचर्या, नियोजित आहार यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, या वयातही त्यांचा आनंद व इच्छाशक्ती दांडगी ...
दवाखाना मक्तण अखंडित दिनचर्या, नियोजित आहार
यासंदर्भात त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, या वयातही त्यांचा आनंद व इच्छाशक्ती दांडगी असून या सर्वांच्या अखंडित दिनचर्येत पहाटे ५ वाजेअगोदर उठणे, स्नान देवपूजेसह स्वच्छ राहणे, गावात सुखदुःखादी भेटीगाठी घेत गल्लीत फेरफटका मारणे, शेतात जाऊन पाहणे, न्याहारीसह, वेळेवरच जेवण, अशा अखंडित दिनचर्येमुळे दवाखाना मुक्त निरोगी आयुष्याचा प्रवास सुरूच असून कोरोना संकटाचादेखील कोणताच परिणाम किंवा भिती त्यांना जाणवत नसल्याचे दिसते. शिवाय अद्यापही त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसही घेतलेली नाही व तशी इच्छाही व्यक्त केली नाही. या प्रत्येक ज्येष्ठांच्या घरातील कुटुंबीयदेखील आपल्या कृपाछत्रांवर व्यवस्थित लक्ष ठेवून त्यांच्या जीवनपद्धतीपासून बोधही घेत असल्याचे बाळू वैजनाथ पाटील, ज्ञानेश्वर लक्ष्मण चौधरी व सुभाष गोसावी यांनी भेटीदरम्यान सांगितले.