न्यायालयाच्या आदेशनंतरही गांधली पाझर तलावाचा वाढीव मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:50 PM2017-09-27T13:50:21+5:302017-09-27T13:51:54+5:30

प्रकल्पग्रस्त वंचित : यंदाही दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे

Even after the order of the court, the increased pay of the Gandhali Pazhar lake is also found | न्यायालयाच्या आदेशनंतरही गांधली पाझर तलावाचा वाढीव मोबदला मिळेना

न्यायालयाच्या आदेशनंतरही गांधली पाझर तलावाचा वाढीव मोबदला मिळेना

Next
ठळक मुद्देसंबंधित कार्यालयाने पाठपुरावा केलेला नाही काही प्रकल्पग्रस्त झाले मयत

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 27 - अमळनेर तालुक्यातील गांधली पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न्यायालयाने 2013मध्ये आदेश देऊनही अद्याप मिळालेला नाही, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी लेखी पत्रकाद्वार केला आहे 
 1998मध्ये गांधली पाझर तलावाच्या संपादित जमीन मालकांना मोबदला देण्यात आला होता मात्र तो कमी असल्याने प्रकल्पग्रस्तांनी अमळनेर वरिष्ठ दिवाणी न्यायालयात विशेष भू-संपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, यांच्याविरोधात अपील दाखल केले होते. त्यावर न्या. जी. पी. अग्रवाल यांनी अर्जदारास वाढीव नुकसान भरपाई रकमेवर भूसंपादन कलम 23 (2)   नुसार 30 टक्के दिलासा रक्कम द्यावी आणि भू-संपादन अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी वाढीव रकमेवर कलाम 4 चे अधिसूचना दिनांकापासून निवाडा तारीख व या करिता 12 टक्के प्रमाणे अतिरिक्त घटक रक्कम द्यावी तसेच अर्जदारास परिनामात्मक ताब्यात दिलेल्या तारखेपासून एक वर्षकरिता 9 टक्के दराने व त्यानंतर रक्कम अदा केल्याच्या दिनांकपयर्ंत 15 टक्के प्रमाणे वाढीव रकमेवर घटक व दिलासा रकमेसह व्याज द्यावे असे आदेश दिले होते मात्र चार वर्षे उलटूनही प्रकल्प ग्रस्त वाढीव मोबादल्यासून वंचित आहेत. 
एकूण 24 जणांनी अपील दाखल केले होते पैकी 13 जण मृत झाले आहेत यंदाही प्रकल्प ग्रस्तांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असल्याने शासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी पी.आर. परदेशी, देवसिंग भील, रामदास भील, रोहिदास पारधी , नारायण पारधी, सुपाबाई पारधी, सीताराम बाविस्कर, सुभाष भामरे, विनायक साली, दोधु महाजन, शंकर पाटील , धर्मराज पाटील, जगदीश पाटील यांनी लेखी पत्रकाद्वारे केले आहे 
 हे प्रकल्पग्रस्त झाले मयत
तानाकू भील, संतोष धनगर, भिवा पारधी, त्र्यंबक भामरे, शेवंताबाई साळी, सुमंबाई साळी, दुगार्बाई चौधरी, श्रीराम पाटील, वामन माळी, नीलकंठ पाटील, सदीबाई पारधी, सुकलाल पारधी आदी प्रकल्पग्रस्त  मयत झाले, मात्र त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही. 

Web Title: Even after the order of the court, the increased pay of the Gandhali Pazhar lake is also found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.