आव्हाणे गावात तुफान दगडफेकीनंतरही तणाव कायम
By admin | Published: June 5, 2017 11:16 AM2017-06-05T11:16:56+5:302017-06-05T11:16:56+5:30
पूर्ववैमनस्य व दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन आव्हाणे, ता.जळगाव येथे रविवारी संध्याकाळी सात वाजता दोन गटात वाद होवून जोरदार हाणामारी झाली.
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5 : पूर्ववैमनस्य व दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन आव्हाणे, ता.जळगाव येथे रविवारी संध्याकाळी सात वाजता दोन गटात वाद होवून जोरदार हाणामारी झाली. यावेळी तुफान दगडफेक झाली व कु:हाडीचा वापर करण्यात आला. दोन्ही गट संतप्त झाल्याने एकमेकांच्या घरात घुसून महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही गटाचे 8 जण जखमी झाले असून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान,गावात दाखल झालेल्या पोलिसांवरही दंगेखोरांनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेमुळ आव्हाणे गावात तणाव निर्माण झाला असून 200 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
अमोल गोकुळ पाटील व योगेंद्र उर्फ बंटी अरुण साळुंखे या दोन तरुणांमध्ये दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन्ही गटाचे लोक एकमेकावर चालून आले. यात तुफान दगडफेक झाली. घरात जावून मारहाण करण्यात आली.
हे आहेत जखमी
शिलाबाई अरुण साळुंखे (वय 50), राजेंद्र चिंतामण सपकाळे (वय 45), प्रकाश अशोक सुरवाडे (वय 25) व योगेंद्र अरुण साळुंखे हे एका गटाचे चार जण तर दुस:या गटाचे प्रल्हाद तुळशीराम पाटील, दत्तात्रय तुळशीराम पाटील, प्रदीप प्रल्हाद पाटील व गोकुळ तुळशीराम पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यांना घेतले ताब्यात
दरम्यान, देवेंद्र दत्तात्रय पाटील, अमोल गोकुळ पाटील, सुनील पानाचंद भालेराव, संजय भिका सपकाळे व आनंदा बळीराम सपकाळे या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रात्रभर कडेकोट बंदोबस्त
गावात तणावाची स्थिती असल्याने वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरार्पयत गावात ठाण मांडून होते. तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी थांबून होते. सोमवारी सकाळी गावात तणावाचे वातावरण होते.