अक्षय्य तृतीयेपूर्वीच भाववाढ, चांदी ११०० तर सोने ३५० रुपयांनी वधारले
By विजय.सैतवाल | Published: May 7, 2024 04:43 PM2024-05-07T16:43:05+5:302024-05-07T16:43:29+5:30
मार्च-एप्रिल महिन्याच्या सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे भाव कमी झाले.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात मंगळवार, ७ मे रोजी थेट १ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८२ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ३५० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ३०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. दोन दिवसांवर आलेल्या अक्षय्य तृतीया सणाच्या पूर्वीच दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढले आहेत.
मार्च-एप्रिल महिन्याच्या सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हे भाव कमी झाले. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसात किरकोळ चढउतार होत राहिले. मात्र मंगळवार, ७ मे रोजी चांदीच्या भावात थेट १ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २५ एप्रिलनंतर ती पुन्हा एकदा ८२ हजारांच्या पुढे जात ८२ हजार ७०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. दुसरीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच ७२ हजारांच्या आत आलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी ३५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ७१ हजार ९५० रुपयांवरून ७२ हजार ३०० रुपये प्रतितोळा झाले. सोने-चांदी खरेदीचा अक्षय मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया सण शुक्रवार, १० मे रोजी असून त्यापूर्वीच सोने-चांदी वधारत आहे.