गरम डोकं थंड करणारा चहाही आता महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:18 PM2022-09-27T13:18:47+5:302022-09-27T13:21:25+5:30

वाचा काय आहे यामागे कारण?

Even the tea that cools the hot head will be expensive now big blow to tea lovers | गरम डोकं थंड करणारा चहाही आता महागणार

गरम डोकं थंड करणारा चहाही आता महागणार

googlenewsNext

संजय देशमुख
जालना : सकाळी  ताजेतवाने होण्यासाठी चहा आवश्यक आहे. मात्र, आता चहापत्तीचे दर किलोमागे सरासरी ८० रुपयांनी वाढणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

श्रीलंकेतील बदलेल्या राजकीय स्थितीमुळे चहापत्तीचे दर वाढ वाढणार आहेत. पूर्वी श्रीलंकेतून जो चहा बहुतांश देशात निर्यात होत होता; परंतु आता तेथील चहाचे मळे आणि कामगारांमध्ये जो समन्वय होता त्यात खंड पडल्याने त्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम भारतातील चहा उद्योगावरही झाला असून, चहापत्तीच्या बारीक काड्यांपासून जो चहा तयार होत, त्याची टंचाई सर्वत्र जाणवत आहे. भारतातील काही मोजक्या कंपन्याच हा चहा उत्पादित करत आहेत. 

शुगर फ्री चहावर संशोधन 
सध्या मधुमेह आजाराने देश आणि जग हैराण आहे. यावर उपाय म्हणून प्रीमिक्स चहाऐवजी शुगर फ्री चहा निर्मितीवर संशोधन सुरू आहे. लवकरच त्याला यश येणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Even the tea that cools the hot head will be expensive now big blow to tea lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.